नागरी उड्डाण मंत्रालय

दरभंग्याहून दररोजच्या विमानांसाठीचे तिकीट आरक्षण या महिनाअखेर सुरु होईल: हरदीप सिंग पुरी

उत्तर बिहारच्या 22 जिल्ह्यांसाठी हे विमानतळ एक वरदान: नागरी विमान वाहतूक मंत्री

उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना

दरभंगा आणि देवघर विमानतळांचा नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडून आढावा

Posted On: 12 SEP 2020 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 सप्टेंबर  2020

दरभंगा ते मुंबई, दिल्ली आणि बेंगरूळू अशा दररोजच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट आरक्षण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी यांनी दिली. बिहारमधील दरभंगा विमानतळ बांधणीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ही हवाई वाहतूक, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच छटपूजेच्या सणाआधी सुरु केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे विमानतळ उत्तर बिहारमधील 22 जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार आहे, असेही पुरी म्हणाले.  यावेळी पुरी यांच्यासह दरभंगा भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरी हवाई वाहतूक विभागाचे सचिव अरविंद सिंह आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

दरभंगा विमानतळाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करत हरदीप पुरी यांनी सांगितले की या विमानतळाचे बहुतांश काम आता पूर्ण होत आले आहे. आगमन आणि निर्गमन सभागृहे, चेक-इन व्यवस्था, कन्व्हेअर बेल्ट इत्यादी कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होतील स्पाईसजेट कंपनीला आरसीएस - उडान अंतर्गत हा मार्ग देण्यात आला आहे.

‘हवाई चप्पल से हवाई जहाज तक’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, सर्वचा क्षेत्रात लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत, असे हरदीप पुरी यांनी सांगितले. दरभंगा येथे बांधकामाचे काम प्रगतीपथावर असतांनाच, इतरही कामे सुरु आहेत. हरदीप पुरी यांच्या उपस्थितीत या विमानतळाच्या धावपट्टीवर स्पाईस जेटच्या उड्डाणासाठीचे मोजमापही करण्यात आले.

झारखंड येथील देवघर विमानतळ बांधणीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. देवघर विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून ते नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भात, त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हे विमानतळ देखील लवकरच सुरु होईल, असेही ते म्हणाले. यासंदर्भात सरकार लवकरच काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 

संथाल प्रदेशात, हवाई वाहतुकीची सुविधा देण्यासोबतच, देवघर विमानतळामुळे पटना, कोलकाता आणि बागडोग्रा या महत्वाच्या विमानतळांना जोडण्याच्या दृष्टीने देखील देवघर विमानतळ महत्वाचे आहे. बिहारच्या भागलपूर आणि जमुनी जिल्ह्यातील लोकांसाठी हे विमानतळ उपयुक्त ठरेल.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ या महत्वाकांक्षी योजनेतील हे एक महत्वाचे पाऊल असून, याद्वारे देशाच्या अंतर्गत भागांना जोडण्याचे, सब उडे, सब जुडे’ हे स्वप्न साकार करणारे आहे, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

 

R.Tidke/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653650) Visitor Counter : 189