गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा (CSCAF 2.0) आणि ‘स्ट्रीट फॉर पीपल’आव्हानाचे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते उद्घाटन
जलद, अभिनव आणि माफक खर्चाच्या योजनांद्वारे, चालण्यास-सुलभ/गतिमान रस्ते विकसित करण्यासाठी शहरांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश
Posted On:
11 SEP 2020 4:40PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते आज, क्लायमेट स्मार्ट सिटीज अॅसेसमेंट फ्रेमवर्क (CSCAF) 2.0म्हणजेच, हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा आणि ‘स्ट्रीट फॉर पीपल’ या दोन महिमांचे आभासी माध्यामातून उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्मार्ट शहर अभियानाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक निश्चित आणि ठोस आराखडा तयार करणे, त्याचवेळी, त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीची योजना आखणे, त्यासाठीच्या गुंतवणुकीचा अंदाज घेणे, असा CSCAF योजनेचा उद्देश आहे. गेल्या एक दशकात, वादळे, पूर आणि उष्णतेच्या लाटांचे प्रमाण, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती असा नैसर्गिक आव्हानांचा आपल्याला सातत्याने सामना करावा लागतो आहे. या घटनांमध्ये लोकांचा बळी जातो, तसेच मोठी वित्तहानीही होते. या संदर्भात,भारतात शहरांचा विकास करतांना नागरी नियोजन आणि विकासाचा दृष्टीकोन, हवामान-पूरक असावा,असा CSCAF च्या या उपक्रमाचा उद्देश आहे. गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाचे सचिव, दुर्गाशंकर मिश्रा, विभागाचे अधिकारी आणि पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव, स्मार्ट सिटीज मिशनचे अधिकारी, प्रमुख यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरांच्या मुल्यांकनाविषयीच्या आधी असलेल्या आराखड्यांचा अभ्यास केल्यानंतर, हा नवा मूल्यांकण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी, सुमारे 26 संस्था आणि 60 विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करण्यात आली. या आराखड्याची मुख्य पाच क्षेत्र असून त्यात 28 निदर्शक आहेत. ही नावे अशी
1.) उर्जा आणि हरित इमारती.
2) नागरी नियोजन, हरितक्षेत्र आणि जैवविविधता,
3) दळणवळण आणि हवेची गुणवत्ता.
4) जलव्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन इत्यादी. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नगरविकास संस्थेनेही CSCAFच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.
‘स्ट्रीट फॉर पीपल’ हे आव्हान आपले रस्ते चालण्यास सुलभ करण्यासाठी आणि पादचारयांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठीचे आव्हान आहे. याचा उद्देश आपल्या शहराला जलद, अभिनव आणि कमी खर्चात होणारी व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रेरणा देणारे अभियान आहे.
क्लायमेट स्मार्ट सिटीजविषयीचे PDF बघण्यासाठी येथे क्लिक करा.
स्ट्रीट फॉर पीपल विषयीचे PDF बघण्यासाठी येथे क्लिक करा.
***
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653328)
Visitor Counter : 268