जलशक्ती मंत्रालय
"भारतातील जलसंपदा क्षेत्राचे विहंगावलोकन" या विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणासह कार्यशाळा
Posted On:
10 SEP 2020 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
जलसंपदा क्षेत्रातील नियोजन, विकास आणि व्यवस्थापन विषयी जल क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रशिक्षण आणि क्षमता वाढविण्याच्या क्षेत्रात जल शक्ती मंत्रालयाचा जलसंपदा विभाग, आरडी आणि जीआर, हे सेंटर फॉर एक्सलन्स – उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्यरत आहे.
बिगस शासकीय संस्था आणि माध्यम प्रतिनिधींसाठी एनडब्ल्यूए, पुणे हे नियमितपणे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवित असते. सध्या महामारीची परिस्थिती उद्भवल्यामुळे, जल शक्ती मंत्रालयाने ऑनलाइन व्यासपीठाचा वापर करीत ``भारतातील जलसंपदा क्षेत्राचे विहंगावलोकन`` विषयावर प्रशिक्षणासह कार्यशाळा असा कार्यक्रम आखण्याचे नियोजन केले आहे, हे दूरस्थ शिक्षण पद्धतीने माध्यम प्रतिनिधींसाठी 05 ते 09 ऑक्टोबर 2020 या काळात घेण्यात येणार आहे.
सहभागींना त्यांच्या संबंधित विद्यमान ठिकाणाहूनच या कार्यक्रमास उपस्थिती दर्शववावी लागेल आणि त्यासाठी त्यांना एनडब्ल्यूएमध्ये येण्याची गरज नाही. यासाठी कोणतेही कार्यक्रम शुल्क आकारले जाणार नाही. उपक्रमाची सविस्तर माहिती पुढे दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
कार्यक्रमाची माहिती पत्रिका : https://nwa.mah.nic.in/upcoming.htm
नामांकन आवाहन पत्र : https://nwa.mah.nic.in/upcoming.htm
अभ्यासक्रम नोंदणी : https://forms.gle/ksbuyHi3AwYHfzHL9
* * *
B.Gokhale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653107)
अभ्यागत कक्ष : 165