विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जिज्ञासा कार्यक्रमाअंतर्गत कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये सीएसआयआर - सीएमईआरआय यांनी केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संशोधनाची माहिती देण्यासाठी वेबिनार


विज्ञानाकडून अपेक्षित उपाय आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी आपण संयुक्त दृष्टिकोण ठेऊन लक्ष्य निश्चित केले पाहिजे त्याचबरोबर विज्ञान आणि समाज यांच्यामध्ये थेट संपर्क स्थापित होण्याची गरज - प्रा. डॉ. हरीश हिरानी

Posted On: 09 SEP 2020 9:52AM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

सीएसआयआर - सीएमईआरआय, दुर्गापूरचे संचालक प्रा. डॉ. हरीश हिरानी यांनी म्हटले आहे की, ‘‘ सामाजिक-आर्थिक विकास घडून आणण्यासाठी विज्ञान ही गुरूकिल्ली आहे. सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळामध्ये सर्वांनी एकजूट होऊन आलेल्या संकटाला तोंड देण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. विज्ञानाकडून अपेक्षित समाधान आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी आपण संयुक्त दृष्टिकोण ठेऊन लक्ष्य निश्चित केले पाहिजे त्याचबरोबर विज्ञान आणि समाज यांच्यामध्ये थेट संपर्क स्थापित होण्याची आवश्यकता आहे.’’ त्यांनी वैश्विक मानकांचा विचार करूनच तितक्याच उत्तम दर्जाची निर्मिती स्थानिक पातळीवर करण्याची आवश्यकता असून त्यासाठी कुशल प्रशासनाची गरज आहे हा मुद्दा अधोरेखित केला.

प्राध्यापक डॉक्टर हरीश हिरानी यांनी काल- दि. 08.09.2020 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने दुर्गापूरच्या सीएसआयआर - सीएमईआरआयच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिज्ञासा कार्यक्रमाअंतर्गत आयोजित वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये सीएसआयआर- सीएमईआरआय यांनी केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संशोधनाची माहिती देण्यासाठी  या  वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राध्यापक हिरानी यांच्याबरोबरच जम्मू आणि काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव, शालेय शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण आणि कौशल्य विकास विभागाचे डॉ. असगर सामून , सीएसआयआर - सीएमईआरआयच्या मुख्य संशोधिका डॉ. अंजली चटर्जी, डॉ. हिमाद्री रॉय, वरिष्ठ संशोधक अविनाश यादव, डॉ. नासिर उल राशीद आणि संशोधक संजय हंसदाह यांनी मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये 3,500 पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652700) Visitor Counter : 276