आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

पायाभूत गुंतवणूक न्यासाच्या माध्यमातून पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहाय्यक कंपन्यांच्या मालमत्तेद्वारे उत्पन्नाला मंत्रिमंडळाकडून मान्यता

Posted On: 08 SEP 2020 9:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने पुढील निर्णयाला मान्यता दिली.

1.    ‘इनव्हीआयटीम्हणजेच पायाभूत गुंतवणूक न्यासाच्या माध्यमातून सध्याच्या एसपीव्ही म्हणजेच विशेष उद्दिष्ट वाहनासाठी(एसपीव्हीज्) निश्चित केलेल्या टेरिफच्या आधारे स्पर्धात्मक बोलीसाठी (टीबीसीबी) मालमत्तांमधून पॉवर ग्रिडला मोबदला घेता येईल.

2.    पॉवर ग्रिड इनव्हीआयटीच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी टीबीसीबी ज्या विशेष उद्दिष्ट वाहनासाठी मोबदला घेणार आहे, ती निर्माणाधीन आहेत किंवा भविष्यात कंपनीकडून अधिग्रहण केली जावू शकतात. हे भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि निश्चित लक्ष्यानुसार करण्यात येईल.

3.    वरील दोन्हीही निर्णय (1 ) आणि (2 )येणा-या पॉवर ग्रिडच्या एसपीव्हीमध्ये  सीपीएसईनुसार बदल झाल्यास लागू ठरणार आहेत.

 

तपशील -

मंत्रिमंडळाच्या केंद्रीय अर्थविषयक समितीने या निर्णयाला मान्यता दिल्यामुळे ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातल्या पॉवरग्रिड टीबीसीबी ट्रान्समिशन मालमत्तेमधून उत्पन्न घेण्याची सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे या कमाईचा उपयोग ट्रान्समिशनचे नेटवर्क विस्तारण्यासाठी त्याचबरोबर इतर भांडवली गुंतवणूक करण्यासाठी होवू शकणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये (सप्टेंबर 2019च्या तपशीलानुसार) पॉवरग्रिड 5 टीबीसीबी मालमत्तेतून जवळपास 7164 कोटी रुपयांची कमाई करू शकणार आहे.

 

फायदे -

इनव्हीआयटीच्या माध्यमामधून मालमत्तेतून कमाई करण्यासाठी पॉवरग्रिडच्या सध्याच्या मनुष्यबळाव्दारे व्यवस्थापन करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे यासाठी कोणत्याही अतिरिक्त रोजगार निर्मितीची आवश्यकता असणार नाही. तथापि व्यापारी बँकिंग, विधी सल्लागार, विश्वस्त, आर्थिक आणि कर आकारणी यांच्यासाठी सल्लागार, मूल्यांकन, मुद्रण, जाहिरात आणि यासंबंधीची कामे यामधून रोजगाराच्या अतिरिक्त संधी  आणि अतिरिक्त कामांची निर्मिती होवू शकणार आहे.

 

पाश्र्वभूमी -

2019-20 च्या अर्थसंकल्पामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देत विकास करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत वाढ करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार देशातल्या सार्वजनिक ऊर्जा कंपन्यांनी व्यावसायिक निर्णय घेवून काम सुरू केले आहे.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652471) Visitor Counter : 227