उपराष्ट्रपती कार्यालय

‘डोळे दान करण्याचे आणि इतरांना प्रेरणा देण्याची शपथ घ्या’ – उपराष्ट्रपतींचे सर्व नागरिकांना आवाहन


स्थानिक पातळीवर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अवयव संग्रहणाची पायाभूत सुविधा आणि विशेषज्ञता तयार करण्याची आवश्यकता – उपराष्ट्रपती

Posted On: 08 SEP 2020 8:44PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की अवयवदान हा एक उदात्त हेतू  आहे आणि प्रत्येकाने नेत्रदानामध्ये सहभागी होण्याचे व इतरांना प्रेरणा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सक्षम (SAKSHAM) या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या  'राष्ट्रीय नेत्र दान पंधरवडा' या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी नेत्रदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक आव्हानांपैकी दृष्टीदोष हा एक असल्याचे सांगून उपराष्ट्रपतींनी असे स्पष्ट केले की भारतातील जवळजवळ 46 लाख लोक अंध आहेत आणि यापैकी बहुतेक 50पेक्षा अधिक वयोगटातील आहेत.

मोतीबिंदू नंतर अंधत्वाचे दुसरे सर्वात प्रमुख करण म्हणजे कॉर्नियल अंधत्व दरवर्षी सुमारे 20,000 लोकांना यामुळे अंधत्व येते; तरुण आणि मुलांना यामुळे मोठ्या प्रमाणात अंधत्व येत असल्यामुळे नायडू यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

देशातील अवयवदात्यांच्या कमी संख्येकडे लक्ष वेधून घेतले त्यांनी जनजागृती करुन तसेच जिल्हा पातळीवर अवयव दान व प्रत्यारोपणासाठी पुरेशी वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण करून ही मानसिकता बदलण्याचे आवाहन केले.

शासकीय रूग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी ग्रामीण भागातील लोकांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दुर्गम भागात जाऊन काही वेळ घालवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. चला आपण देशातील अंधत्व दूर करूया”, अशी विनंती केली. 

राष्ट्रीय अंधत्व  सर्वेक्षण (2015-19) चे उद्धरण देताना   नायडू म्हणाले की 2006-07 च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील 1 टक्क्याच्या  तुलनेत देशातील अंधत्वाचे प्रमाण कमी होऊन ते  0.36% झाले आहे. तसेच, ‘सार्वत्रिक नेत्र आरोग्य 2014-19 साठी डब्ल्यूएचओ जागतिक कृती योजनेची उद्दीष्टे भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली असून 2010 आधारभूत पातळीपेक्षा 2019 पर्यंत दृष्टीदोषाचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमआकडेवारीनुसार (NPCB&VI), NPCB&VI अंतर्गत 64 लाखांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या असून, कॉर्नियल प्रत्यारोपणासाठी एकूण 65 लाख दान केलेले डोळे संकलित करण्यात आले आणि शालेय मुलांना 8.57 लाख चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

सक्षमचे अध्यक्ष डॉ. दयालसिंग पंवार, सक्षमचे उपाध्यक्ष डॉ. पवन स्थानक, सक्षमचे संघटन सचिव डॉ. सुकुमार आणि सक्षमचे सरचिटणीस डॉ. संतोषकुमार क्रालेती आणि इतर मान्यवर आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652454) Visitor Counter : 241