शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 54 वा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
सन 2030 पूर्वी संपूर्ण साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन साक्षरता योजना- ‘‘पढना लिखना अभियान’’ झेप घेईल - शिक्षण मंत्री
Posted On:
08 SEP 2020 6:45PM by PIB Mumbai
शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 54व्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी युनेस्कोच्या प्रतिनिधींनी युनेस्कोच्या महा संचालकांचा संदेश वाचला. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव अनिता कारवाल आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोविड-19 महामारीच्या काळामध्ये निर्माण झालेले संकट आणि त्यापलिकडे जावून साक्षरता वर्गाला शिकवणे आणि शिकणे, या विषयावर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाषणे झाली. साक्षरता विभाग आणि दिल्ली विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि विस्तार कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. जे.पी. दुबे यांनी देशातली निरक्षरता संपुष्टात आणण्यासाठी भविष्यात योजना राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना शिक्षण मंत्री पोखरियाल म्हणाले, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणजे जगभरातल्या देशांनी निरक्षरता निर्मूलनासाठी आपण वचनबद्ध असल्याबद्दल तसेच यासाठी दृढ संकल्प केला असल्याची पुष्टी करण्याचा दिवस आहे.
यंदा कोविड-19 महामारीचा उद्रेक संपूर्ण जगभर झाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनासाठीही या संकटामध्ये साक्षरता अध्ययन आणि अध्यापन आणि त्यापलिकडे, या विषयावर शिक्षकांच्या भूमिकेवर तसेच शिक्षण प्रक्रियेतील बदलाविषयी भर देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने तरूण आणि प्रौढ लोकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. साथीच्या काळामध्ये साक्षरता कार्यक्रमात नाविन्यपूर्ण आणि प्रभावी अध्यापनशास्त्राच्या पद्धती कशा वापरण्यात येवू शकतात, याविषयी विचार करून त्यावर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे.
सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘‘पढना लिखना अभियान’ या नवीन साक्षरता मोहिमेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागामधील 57 लाखांपेक्षा जास्त निरक्षर आणि अंकओळख नसलेल्या लोकांना समाविष्ट करून घेण्यात येत आहे. या निरक्षरांचा वयोगट 15 पेक्षा जास्त आहे. काही कारणांमुळे शाळेत जावू न शकलेल्यांना या अभियानातून शिकविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
International Literacy Day. #SaaksharBharatAatmanirbharBharat #PadheBharatBadheBharat @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @UNESCO @PIB_India @MIB_India @DDNewslive https://t.co/MchgjV8Nvs
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) September 8, 2020
--------
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652395)
Visitor Counter : 254