निती आयोग

स्टार्टअप संशोधकांना सक्षम करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशनची फ्रेशवर्क्स कंपनीसोबत भागीदारी

Posted On: 07 SEP 2020 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2020

 

देशातील नवसंशोधक आणि उद्योजकांना सक्षम पाठिंबा देण्याच्या दृष्टीने, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने फ्रेशवर्क्स आयएनसी या  सॉफ्टवेअर कंपनीसोबत भागीदारी केली आहे

या भागीदारीमुळे, अटल इनोव्हेशन मिशन संदर्भात संस्था आणि स्टार्ट अप कंपन्यांची कार्यक्षमता वाढणार असून, स्टार्टअप नवसंशोधक आणि नवउद्योजकांमध्ये नवोन्मेषाला चालना मिळणार आहे.

या भागीदारीअंतर्गत, फ्रेशवर्क्स कंपनी, त्यांच्या उत्पादनांचा वापर अटल इनोवेशन मिशन आणि त्यांच्या लाभार्थ्यांना करु देईल, ज्यामुळे, स्टार्ट अप कंपन्या कमी खर्चात आपली कामे अधिक कार्यक्षमतेने करु शकतील. या अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणारी उत्पादने फ्रेशसेल्सशी सबंधित आहे—म्हणजेच सीआरएम सॉफ्टवेअर, फ्रेशडेस्क- ग्राहकांसाठीच्या सुविधेविषयीचे सॉफ्टवेअर, फ्रेशचाट-ग्राहकांना मेसेज पाठवणारे सॉफ्टवेअर, फ्रेश रिलीज-अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, फ्रेशकॉलर-क्लाऊड टेलिफोनी सॉफ्टवेअर, फ्रेशमार्केटर- मार्केटिंग ऑटोमेशन सॉफ्टवेअर, फ्रेशटीम- एचआर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, फ्रेशसर्व्हिस आणि आयटी सर्व्हिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर,इत्यादींचा समावेश आहे.

फ्रेशवर्क्स च्या तज्ञ विभागांकडून संसाधने आणि मार्गदर्शन देखील या अंतर्गत पुरवले जाईल. त्यात प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने फ्रेशवर्क्सच्या टीम लीडर्सची तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर तज्ञाशी देखील बोलता येईल.

या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनसोबत विविध वेबिनार्स आयोजित केले जातील. यात कार्यशाळा, मोड्यूल प्रशिक्षण आणि इतर संबंधित मुद्यांचा समावेश असेल.

या आभासी कार्यक्रमाला AIM चे अधिकारी, नीती आयोग आणि फ्रेशवर्क्स,विविध स्टार्ट अप कंपन्यांचे प्रतिनिधी, AIM- संलग्न शाळांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652048) Visitor Counter : 190