रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेच्या आणखी 40 विशेष दुतर्फा गाड्या 12 सप्टेंबर 2020 पासून धावणार
12मे 2020 पासून सुरू असलेल्या विशेष राजधानी प्रकारच्या 30 गाड्या आणि 01जुन 2020 पासून सुरू झालेल्या 200 विशेष मेल एक्स्प्रेस व्यतिरिक्त या गाड्या असतील (एकूण 230 रेल्वेगाड्या)
या सगळ्या पूर्णपणे आरक्षित रेल्वेगाड्या असतील
Posted On:
05 SEP 2020 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2020
रेल्वे मंत्रालयाने (एमओआर) आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि गृहमंत्रालयाशी (एमएचए) सल्लामसलत करून 40 दुतर्फा विशेष रेल्वेगाड्या (80 रेल्वे) 12 सप्टेंबर 2020 पासून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परिशिष्ठामध्ये सविस्तर उल्लेख केल्याप्रमाणे या 40 रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. (लिंक खाली दिली आहे.) या रेल्वेगाड्यांसाठीचे आरक्षण 10 सप्टेंबर 2020 पसून सुरू होणार आहे. या पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील.
12-05 - 2020 पासून यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या राजधानी पद्धतीच्या 30 विशेष रेल्वेगाड्या आणि 200 विशेष मेल एक्स्प्रेस (एकूण 230 रेल्वे) रेल्वेगाड्यांच्या शिवाय या गाड्या नव्याने धावणार आहेत.
हे लक्षात घेतले पाहिजे की, 12-05-2020 पासून सुरू झालेल्या भारतीय रेल्वेच्या राजधानी पद्धतीच्या 30 विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत आणि 01-06-2020 पासून सुरू झालेल्या विशेष मेल एक्स्प्रेस पद्धतीच्या 200 गाड्या (एकूण 230 रेल्वे) सध्या धावत आहेत.
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651783)
Visitor Counter : 255