आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा उच्चांक नोंदवला, 70,000 हून अधिक कोविड रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
तीन चतुर्थांश पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले
बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 31 लाखांवर
Posted On:
05 SEP 2020 8:12PM by PIB Mumbai
भारताची चाचणी, शोध आणि उपचार रणनीती ठोस परिणाम दाखवत आहे. एका दिवसात 70,000 हून अधिक कोविड रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 70,072 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या कोविड -19 रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.23% वर गेला आहे. यामुळे मृत्युदरातही घट झाली असून तो आज 1.73% या नीचांकी पातळीवर आला आहे.
चाचण्यांच्या माध्यमातून लवकर निदान झाल्यामुळे मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येत आहेत मात्र रुग्णांवर वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि देखरेख तसेच संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आल्यामुळे दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे वाढते प्रमाण आणि घटता मृत्युदर यावरून भारताची श्रेणीबद्ध रणनीती उत्तम काम करत असल्याचे आढळून आले आहे.
भारताने सक्रिय रुग्णांपेक्षा (846,395) 22.6 लाखांपेक्षा अधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवली आहे. सध्या एकूण रुग्णांपैकी केवळ 21.04% सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 31 लाख (31,07,223) वर गेली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 60% रुग्ण पाच राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक 21% असून त्याखालोखाल तमिळनाडू 12.63%) , आंध्र प्रदेश (11.91%) कर्नाटक (8.82%) आणि उत्तर प्रदेश (6.14%) आहेत.
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651651)
Visitor Counter : 216