रसायन आणि खते मंत्रालय
फर्टिलायझर अँन्ड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड 560 मेट्रिक टनाचे अमोनियम सल्फेटचे आणखी 20 कंटेनर हल्दिया बंदराकडे किनारी जलवाहतुकीद्वारे पाठवत आहे
खत क्षेत्रातला सार्वजनिक उपक्रम आपल्या उत्पादनाच्या वाहतुकीसाठी प्रभावी माध्यम म्हणून किनारी जलवाहतुकीचा उपयोग करत आहे
यामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारी भागातल्या शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेगाने आणि वेळेवर उपलब्ध होईल
Posted On:
04 SEP 2020 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2020
फर्टिलायझर अँन्ड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) हा खत आणि रसायन मंत्रालया अंतर्गत असलेला सार्वजनिक उपक्रम, आपल्या उत्पादनासाठी किनारी जलवाहतूकीचा नवे आणि प्रभावी वाहतुकीचे साधन म्हणून उपयोग करत आहे. यामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारी भागातल्या शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेगाने आणि वेळेवर उपलब्ध होईल. यामध्ये एफएसीटीला कोचीन पोर्ट ट्रस्टचे सहकार्य लाभणार आहे. किनारी जलवाहतुकीद्वारे आणण्यात आलेली खते त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी पुढे रेल्वेचा वापर करण्यात येईल.
किनारी जलवाहतुकी द्वारे खतांच्या मालवाहतुकीसाठी अनुदानासाठी विचार करण्याच्या सरकारच्या धोरणाला अनुसरून, एफएसीटीने निवडक ठिकाणी थैलीमधली खते पाठवण्यासाठी किनारी जलवाहतुकीचा उपयोग करण्याची सुरवात केली आहे. कोचीनहून अमोनियम सल्फेटचे पहिले 20 कंटेनर पश्चिम बंगालमधल्या हल्दिया बंदराकडे 30 जुलै 2020 ला किनारी जलवाहतुकी द्वारे यशस्वीरित्या पाठवल्यानंतर कंपनी खताचे आणखी 20 कंटेनर (560 मेट्रिक टन अमोनियम सल्फेट) त्याच ठिकाणी पाठवत आहे.
खतांच्या थैल्या कंटेनर मध्ये भरण्याचे काम एफएसीटीच्या उद्योगमंडल इथे 2 सप्टेंबर 2020ला पूर्ण झाले आहे आणि 4 साप्तेम्बारला जहाज नियोजित आहे.
समुद्र मार्गे खतांची वाहतूक केल्याने रेल्वे आणि रस्तामार्गे खत वाहतुकीवरचा ताण काही प्रमाणात कमी होईल.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651407)
Visitor Counter : 164