वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलतील - पियुष गोयल
Posted On:
03 SEP 2020 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2020
केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलणार आहेत. “भारतात नवोदित उद्योजकांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला समविचार देशांसह आणि विश्वासू भागीदारांसह एक व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे.”नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारत अन्य देशांना सहभागी करून घेऊ शकतो आणि विश्वासू भागीदारांसह एक व्यासपीठ तयार करू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक संशोधन निर्देशांकात भारताची 52 व्या क्रमवारीवरून 48 व्या क्रमवारीवर झालेल्या प्रगतीबाबत बोलताना, श्री गोयल म्हणाले, “खऱ्या अर्थाने भारताला संशोधनाचे केंद्र बनविण्यासाठी सगळे जण मिळून एकत्र काम करूया. भारतात व्यवसाय करणे सहज आणि सोपे होण्यासाठी उद्योगक्षेत्र प्रोत्साहन देईलच शिवाय सरकार देखील सक्रीयपणे नवीन कल्पना आणि प्रक्रियांचा अवलंब करून पुढे जाईल. या पृथ्वीतलावरची कोणतीही शक्ती आपल्याला यशस्वी होण्यापासून आता रोखू शकणार नाही.”
रेल्वेमधील संशोधनाबाबत बोलताना, गोयल म्हणाले, गेल्या सहा वर्षांत, आपल्या भारतीय कोच बनविणाऱ्या कंपन्यांनी केवळ जुन्या पद्धतीचे कोच बनविणे बंद केले नाही तर, आता आपण त्यापेक्षा चांगल्या दर्जाचे एलएचबी पद्धतीचे कोच बनवित आहोत.
ज्येष्ठ उद्योजकांनी लहान, मध्यम उद्योजकांचे मार्गदर्शक व्हावे आणि त्यांना त्यांचे कौशल्य आणि क्षमता वापरून काम करण्यासाठी दिशादर्शकाचे काम करावे, असे आवाहन श्री. गोयल यांनी ज्येष्ठ उद्योजकांना केले. ते म्हणाले, “मी त्यांना आवाहन करतो, की त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ या कामी द्यावा. तरूणांना यामुळे खूप प्रोत्साहन मिळेल.”
आत्मनिर्भर भारताचा संदर्भ देताना मंत्री म्हणाले की, भारताकडे नवीन उद्योगांसाठी प्रचंड क्षमता आहे. “भारताला समृद्ध करणे हे उद्दिष्ट आहे. ते गाठण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम केले पाहिजे.” पंतप्रधान म्हणाले आहेत, “आपल्यासमोर एकाच वेळी लक्षावधी अडचणी आहेत, आणि आपल्याकडे अब्जावधी माणसे आहेत.” आपल्या उद्योगाने बुद्धिमान भारतीय उद्योजकांची क्षमता आणि नवोदित व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक व्यवसायांना मागे टाकण्याची क्षमता खरोखरच दर्शविली आहे.
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651058)
Visitor Counter : 213