गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूज्य स्वामी श्री नारायण गुरुजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली


“समाजसुधारक, अध्यात्मिक गुरु आणि समानता व बंधुत्वाचे प्रबळ प्रसारक म्हणून स्वामी श्री नारायण गुरूजी यांनी केरळमध्ये भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध समाज सुधारणेचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली”

Posted On: 02 SEP 2020 5:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूज्य स्वामी श्री नारायण गुरु जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज आदरांजली वाहिली आहे. ट्वीट संदेशात ते म्हणाले, समाजसुधारक, अध्यात्मिक गुरु आणि समानता व बंधुत्वाचे प्रबळ प्रसारक म्हणून स्वामी श्री नारायण गुरूजी यांनी केरळमध्ये भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध समाज सुधारणेचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, स्वामी श्री नारायण गुरुजींच्या अथक प्रयत्न आणि योगदानामुळे झालेले वंचितांचे सबलीकरण आणि शिक्षणासाठीचे कार्य कधीच विसरले जाऊ शकत नाही. त्यांचे तत्वज्ञान, शिकवण आणि विचार देशाच्या  कानाकोपऱ्यातील लाखो लोकांचे आयुष्य समृद्ध करतील.    

Tributes to venerable Swami Sree Narayana Guru ji on his Jayanti. As a social reformer, spiritual leader and strong advocate of equality & brotherhood, he played an instrumental role in setting up the foundations for social reform in Kerala against discrimination and injustice.

— Amit Shah (@AmitShah) September 2, 2020

Swami Sree Narayana Guru ji's relentless effort and contribution towards the empowerment & education of the downtrodden can never be forgotten. His philosophy, teachings and thoughts will continue to enrich the lives of millions across the length & breadth of the country.

— Amit Shah (@AmitShah) September 2, 2020

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650658) Visitor Counter : 155