संरक्षण मंत्रालय
‘मेक इन इंडिया’ ला आणखी चालना; भारतीय लष्कराला पिनाका रेजिमेंट्सच्या पुरवठ्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय कंपन्यांबरोबर केले 2580 कोटी रुपयांचे करार
Posted On:
31 AUG 2020 8:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
संरक्षण क्षेत्रात केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आणखी चालना देत संरक्षण मंत्रालयाच्या (एमओडी) अधिग्रहण विभागाने आज भारतीय लष्कराच्या तोफखान्यांच्या रेजिमेंटला अंदाजे 2580 कोटी.रुपये खर्चाच्या सहा पिनाका रेजिमेंट्स पुरवण्यासाठी मेसर्स भारत अर्थ मूवर्स लि. (बीईएमएल), मे. टाटा पॉवर कंपनी लि. (टीपीसीएल) आणि मे.एल अँड टी बरोबर करार केले. या सहा पिनाका रेजिमेंट्समध्ये ऑटोमेटेड गन एमिन्ग अँड पोझिशनिंग सिस्टम (एजीएपीएस) सह 114 लाँचर आणि 45 कमांड पोस्ट्स मे. टीपीसीएल आणि मे .एल अँड टी कडून पुरवल्या जातील. तर मे. बीईएमएलकडून 330 वाहने खरेदी करण्यात येतील. या सहा पिनाका रेजिमेंट्स आपल्या देशाच्या उत्तर आणि पूर्व सीमांवर कार्यरत असतील आणि यामुळे आपल्या सशस्त्र दलांची कार्य सज्जता आणखी वाढेल. 2024 पर्यंत सहा पिनाका रेजिमेंट्स सामील करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
खरेदी (भारतीय) वर्गीकरण अंतर्गत या प्रकल्पात 70% स्वदेशी सामग्री असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्याला मंजुरी दिली आहे.
पिनाका मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टम (एमएलआरएस) ची स्वदेशी रचना आणि विकास डीआरडीओने केला आहे आणि वर नमूद केलेल्या संरक्षण उद्योगांनी त्याचे उत्पादन केले आहे. हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो संरक्षण तंत्रज्ञानामध्ये 'आत्मनिर्भरता ' आणण्यासाठी केंद्र सरकारच्या (डीआरडीओ आणि एमओडी) अखत्यारीत सार्वजनिक खासगी भागीदारीचे दर्शन घडवत आहे.
M.Chopade /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650126)
Visitor Counter : 212