सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

भारताला उत्पादन केंद्र बनवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता: नितीन गडकरी


गडकरींच्या हस्ते भिवडी येथे तंत्रज्ञान केंद्राचे उद्‌घाटन; 15 नवीन तंत्रज्ञान केंद्रांची लवकरच उभारणी

Posted On: 31 AUG 2020 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील भिवडी येथील तंत्रज्ञान केंद्राचे उद्‌घाटन केले. ते म्हणाले उत्पादन क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 22 ते 24% वाटा आहे, पंतप्रधानांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या आवाहनानंतर 15 नवीन तंत्रज्ञान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे आणि 18 केंद्र अद्ययावत केली जाणार आहेत. आपल्या देशाला उत्पादनकेंद्र बनवण्यासाठी कुशल मनुष्यबळ अत्यावश्यक आहे.

गडकरी पुढे म्हणाले, तंत्रज्ञान केंद्र मध्यस्थ म्हणून काम करु शकतात, स्थानिक उद्योगांच्या गरजपूर्तीसाठी तंत्रज्ञान केंद्रांना नवीन मशीनरी आणि नवीन तंत्रज्ञानासाठी कर्जपुरवठा करण्याचा आमचा विचार आहे. या तंत्रज्ञान केंद्रांसाठीच्या विस्तार केंद्रांचेही काम सुरु आहे. त्यांनी राज्य सरकारांना आवाहन केले या विस्तारीत केंद्रांसाठी जागा द्यावी आणि बाकीची मदत करावी. विस्तारीत केंद्र परिसरातील नव्या आणि जुन्या उद्योगांच्या गरजांची पूर्तता करेल. त्यांनी सुचवले की, सध्या अस्तित्वात असलेली पॉलिटेक्निक्स, आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या पायाभूत सुविधांचा उपयोग युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी आणि उद्योगांना मदत करण्यासाठी करावा.

एमएसएमई राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी तंत्रज्ञान केंद्राबद्दल भिवडी येथील नागरिकांचे अभिनंदन केले आणि परिसराच्या विकासात हे केंद्र मैलाचा दगड ठरेल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, देश सध्या कोविड-19 संक्रमणाच्या संकटाला तोंड देत आहे आणि अशाप्रकारची केंद्र फार महत्त्वाची ठरतात, या माध्यमातून उत्पादनात वाढ होऊन बेरोजगारी कमी होते आणि देशाच्या स्वावलंबनाचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यांनी युवकांना कौशल्यवृद्धीसाठी आवाहन केले, युवकांनी उद्योगांसाठी आणि पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी तयार राहावे, असे ते म्हणाले.           

 

 

M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650037) Visitor Counter : 156