पर्यटन मंत्रालय
देखो अपना देश वेबिनार मालिके अंतर्गत पर्यटन मंत्रालयाकडून ‘हम्पी –भूतकाळापासून स्फूर्ती; भविष्याकडे वाटचाल ‘ या वेबिनारचे आयोजन
Posted On:
31 AUG 2020 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
पर्यटन मंत्रालयाने, देखो अपना देश वेबिनार मालिके अंतर्गत ‘हम्पी –भूतकाळापासून स्फूर्ती; भविष्याकडे वाटचाल ‘ या वेबिनारचे 29 ऑगस्ट 2020 ला आयोजन केले होते. वारसा स्थळ म्हणून आणि पर्यटन स्थळ म्हणूनही हम्पीच्या आवश्यकतांची दखल घेण्यासाठी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक समस्यांची दखल घेण्यावर यामध्ये एकात्मिक दृष्टीकोनावर वेबिनारमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले. एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमा अंतर्गत भारताच्या वैभवशाली वैविध्याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न देखो अपना देश वेबिनार मालिकेतून करण्यात आला आहे.
किष्किंधा ट्रस्टच्या संस्थापक आणि इंटाच अनेगुंडी हम्पीच्या संयोजक शामा पवार यांनी प्रस्तुत केलेल्या वेबिनारमध्ये विजयनगरच्या अखेरच्या हिंदू साम्राज्याची महान राजधानी असलेल्या भव्य स्थळांचे दर्शन घडवले. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ सूचित समाविष्ट असलेली हम्पी, तुंगभद्रा नदी, डोंगररांगा,आणि मैदाने यांनी नटलेली असून इथे मोठ्या प्रमाणात अवशेषाच्या खुणा दिसतात. वैविध्यपूर्ण नागरी, राजेशाही आणि प्रणालीचा आविष्कार 1600 हून अधिक अवशेषातून आपल्याला दिसून येतो. यामध्ये किल्ले, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मृती स्तंभ, प्रवेशद्वारे, संरक्षण चौक्या, जल संरचना यांचा समावेश आहे.
हम्पीच्या इतिहासापासून सुरवात करण्यात आली. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचे नाव तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव पम्पा यावरून ठेवण्यात आले. 1336 मध्ये काम्पिली राजवट नष्ट होऊन विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. दक्षिण भारतातल्या प्रसिद्ध हिंदू साम्राज्यापैकी एक म्हणून विकसित झालेली ही राजवट 200 वर्षाहून अधिक काळ राहिली. विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी बौद्धिक आणि कलेला चालना दिली आणि मजबूत सैन्य राखत आपल्या उत्तरेच्या आणि पूर्वेच्या सुलतानाशी लढायाही केल्या. रस्ते, जलविषयक कामे, कृषी,धार्मिक इमारती आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली. हे स्थळ बहु धर्मासाठी आणि बहु वांशिक होते, हिंदू आणि जैन स्मृतीस्थळे इथे जवळ जवळ होती. इमारतीत प्रामुख्याने दक्षिण भारतीय हिंदू कला आणि स्थापत्यात अहिलोपत्तदकल शैली आहे तर लोटस महाल, सार्वजनिक न्हाणी यामध्ये इंडो- इस्लामिक स्थापत्य घटकांचा वापरही हम्पी मध्ये करण्यात आला होता.
हम्पी मधल्या प्रसिद्ध स्थळांचा उल्लेख करताना 15 व्या शतकातल्या विरुपाक्ष मंदिराचा उल्लेखी करण्यात आला. हे शहराच्या सर्वात प्राचीन स्मारकापैकी एक आहे. मुख्य तीर्थस्थळ भगवान शिव यांचे एक रूप विरुपाक्ष यांना समर्पित आहे.
हम्पी हे ध्यानधारणेचे स्थळ असून एखाद्या छोटेखानी चित्राप्रमाणे भासते. हम्पी मधून फेरफटका मारताना काळाचे भान रहात नाही. हम्पीच्या नैसर्गिक वारश्यामध्ये खडक, दलदलीची भूमी, तुंगभद्रा नदी, पक्षी आणि वन्यजीवन विविध वनस्पती यांचा समवेश आहे. चंदन वृक्ष प्रमाणे काही वृक्ष इथे नैसर्गिक उगवतात. सिंचन व्यवस्था चांगली असून भात लागवडीला सहाय्यकारी आहे. पक्षी, सुंदर देखावा, नदी यांचे विहंगम दृश पाहण्यासाठीही लोक इथे भेट देतात.
हम्पी हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गांनी जोडलेली आहे. सत्र समाप्तीच्या वेळी वेबिनारशी संबंधित पाच प्रश्न विचारले जातील,दर्शक mygov.inद्वारा यात सहभागी होऊ शकतील यशस्वी दर्शकांना ई प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. प्रत्येक वेबिनारशी संबंधित प्रश्नही पर्यटन मंत्रालयाच्या सोशल हॅन्डलवर पोस्ट करण्यात येईल.
देखो अपना देश वेबिनार मालिका राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग, इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याशी तंत्रविषयक भागीदारी करून सादर करण्यात येत आहे. वेबिनारची सत्रे https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured यावर उपलब्ध आहेत.तसेच पर्यटन मंत्रालयाच्या सोशल हॅन्डलवरही आहेत.यापुढचा वेबिनार पंजाब संदर्भात असून 5 सप्टेंबर 2020 ला सकाळी 11 वाजता होणार आहे.
M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650036)
Visitor Counter : 189