आदिवासी विकास मंत्रालय

कोविड संक्रमणाविरोधात विशेष संवेदनशील आदिवासी समुहांच्या सुरक्षेसाठी अंदमान आणि निकोबार प्रशासन सज्ज


स्थानिक आदिवासी समुहाची सुरक्षा आणि कल्याण यासंदर्भात आदिवासी व्यवहार मंत्रालय नियमितपणे अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या संपर्कात-अर्जुन मुंडा

Posted On: 29 AUG 2020 11:08PM by PIB Mumbai

 

अंदमान आणि निकोबार प्रशासन विशेष संवेदनशील आदिवासी समुहांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सतर्क असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या अहवालात अंदमान आणि निकोबार प्रशासनाने माहिती दिली आहे की, मार्च महिन्याच्या मध्यापासूनच, म्हणजे कोविड-19 रुग्णाची नोंद झाली नव्हती, त्यावेळपासून प्रशासनाने सक्रीयपणे अनेक उपाययोजना केल्या. अंदमान आणि निकोबार बेटावर सहा अधिसूचित अनुसूचित जमाती आहेत. निकोबारींव्यतिरिक्त, उर्वरित पाच ग्रेट अंदमानीज, जारवा, सेंटिनेलीज ओंजे आणि शॉम्पन हे आदिवासी समुह आहेत.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी ट्वीट संदेशात म्हटले की, अंदमान आणि निकोबार प्रशासन आदिवासींच्या सुरक्षेसाठी सतर्क आहे, विशेषतः उच्च जोखीम गटातील आदिवासी समुहांसंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सतर्क आहे आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय नियमितपणे अंदमान आणि निकोबार प्रशासनासोबत नियमित संपर्कात आहे.

अंदमान आदिम जनजाती विकास समिती ही असुरक्षित आदिवासी समुहांचे (पीव्हीजी) कल्याण आणि संरक्षणासाठीची नोंदणीकृत संस्था आहे. निकोबार जिल्ह्याचे उप आयुक्त एकात्मिक आदिवासी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून निकोबारी आदिवासींच्या कल्याणाकडे लक्ष देत आहेत. प्रशासनाने ग्रेट अंदमानीज आणि जारवा यांना स्ट्रेट द्वीप आणि जारवाच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतरीत केले आहे, जेणेकरुन त्यांचा बाहेरच्या व्यक्तींसोबत संपर्क येणार नाही. जारवा जमातीच्या सुरक्षेसाठी काफिल्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना आदिवासी समुहांशी नियमित संवाद साधून त्यांना मास्क, ग्लोव्हज आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. कोविड-19 संदर्भात छायाचित्र आणि चित्रफितींच्या माध्यमातून स्थानिक भाषांमध्ये माहिती देण्यात आली आहे. व्यवस्थित कोविड चाचणी केल्यानंतरच अंदमान आदिवासी जनजाती विकास समिती आणि यासारखे इतर कार्य करणाऱ्या संघटनांच्या सदस्यांना परवानगी देण्यात येत आहे. आदिवासी समुहामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना बाहेरील व्यक्तींसोबत संवाद साधू नये, असे सांगण्यात आले आहे.

Precautionary measures are being taken to protect these Vulnerable Tribal Groups from the Covid-19 pandemic. Officials from the Ministry are regularly in touch with the local administration in Port Blair, working for the welfare of the indigenous tribal group in the islands.

— Arjun Munda (@MundaArjun) August 28, 2020

जारवा जमातीला बाण करण्यासाठीची साधनसामग्री पुरवण्यात आली आहे. अंदमान आदिवासी जनजाती विकास समितीकडून पश्चिम किनारपट्टीवर गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस, वन विभाग, मत्स्य विभागाने मच्छीमारांनी जारवांसोबत संवाद साधू नये याविषयी जागृती केली आहे. जारवांना लहान समुहात राहण्यास सांगण्यात आले आहे. एएजेव्हीएस कर्मचाऱ्यांकडून जारवांच्या यितर्जी, बांबू ऑफ तिर्की, फुलटला, शांतीपूर आणि कटाईडेरा येथील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. बहुतांश ग्रेट अंदमानीजना एप्रिलमध्ये कोविड चाचण्या करुन स्ट्रेट बेटावर स्थलांतरीत करण्यात आले आहे, मात्र अनेक ग्रेट अंदमानीज शासकीय नोकरीत असून पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात. अनलॉकनंतर जूनमध्ये अनेक कुटुंब पोर्ट ब्लेअरला आले आहेत. ऑगस्ट महिन्यात रुग्णांची वाढती संख्या पाहून अंदमानीजना परत स्ट्रेट बेटावर राहण्यास सांगण्यात आले.

19 चाचणी करताना काही अंदमानीज आदिवासींना सौम्य लक्षणे असल्याचे आढळून आले, त्यापैकी तिघे आजारातून बरे झाले आहेत आणि इतरांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून जी बी पंत रुग्णालयात आणि गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याचजणांना स्ट्रेट बेटावर ठेवण्यात आले आहे. सक्रीय रुग्णांची तब्येत चांगली असून त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवले जात आहे. ग्रेट अंदमानीजमध्ये कोविड-19 पॉझिटीव्हचे प्रमाण वाढल्यामुळे, प्रशासनाने दुगाँग खाडीवरील ओंज जमातीतील सदस्यांचे नमुने गोळा केले, ते सर्व निगेटीव्ह आले. प्रशासनाने जारवा जमातीच्या व्यापक चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष संवेदनशील आदिवासी समुहाच्या संरक्षणासाठी अंदमान आणि निकोबार प्रशासन वचनबद्ध आहे. मानवतेच्या वारशाचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अंदमान आणि निकोबार प्रशासनाने विशेष संवेदनशील आदिवासी समुहांच्या सुरक्षेसाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

*****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649725) Visitor Counter : 140