पर्यटन मंत्रालय
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टूरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंटतर्फे कोविड-19 महामारी दरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत यावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले
Posted On:
28 AUG 2020 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचे उद्धिष्ट सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी पर्यटन मंत्रालय वेगवेगळे उपक्रम करते. कोविड-19 महामारीदरम्यानही भारत केंद्रीय हॉटेल व्यवस्थापन संस्था ही NCHMCTशी संलग्न संस्था आणि इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टूरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट यांच्यातर्फे 8 मे 2020 ते 24 ऑगस्ट 2020 दरम्यान ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले गेले. या उपक्रमांमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कल्पनेच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या अनेकांनी उत्साही सहभाग नोंदवला.
या उपक्रमांमध्ये आभासी ऑनलाईल प्रश्नमंजूषा, वेबीनार यांचा समावेश होता, IHM हैदराबादने हरयाणवी पाक कृतींवर ऑनलाईन सादरीकरण, उत्तरप्रदेशातील पाककृतीं आणि संस्कृतीवर वेबीनार केले. याला IHM शिलाँग आणि IHM लखनौच्या विद्यार्थ्यी उपस्थित होते. ओदिशातील लोकप्रिय अन्नपदार्थांवर IHM मुंबईने व्हीडियो प्रसारित केला. तसेच समाजमाध्यमांद्वारे ओदिशा पाककृतींवर ऑनलाईन प्रश्नमंजूषा तसेच ऑनलाईन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतली.
इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टूरिजम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (IITTM)ने एक भारत श्रेष्ठ भारत यावर ऑनलाईन राष्ट्रीय कवितालेखन आणि सादरीकरण स्पर्धा घेतली.
संपूर्ण देशभरातून यासाठी नोंदणी खुली होती. आणि सहभागींना यासाठी त्यांनी लिहीलेली कविता आणि तिचे सादरीकरण केलेला व्हीडियो पाठवणे अपेक्षीत होते.
कवितेचा विषय, भाषा आणि कवितेतील नाविन्यपूर्ण सृजन तसेच सादरीकरण यावर निकाल आधारीत होता.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649205)
Visitor Counter : 205