आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविडचे संक्रमण कार्यक्षमतेने मर्यादित ठेवण्यासाठी आणि मृत्यूदर 1 % पेक्षा खाली ठेवण्याचे राज्यांना आवाहन
कोविडच्या वाढत्या मृत्यूदराबाबत 10 राज्य / केंद्रशासित प्रदेशांचा केंद्रिय मंत्रिमंडळ सचिवांनी घेतला आढावा
Posted On:
27 AUG 2020 9:44PM by PIB Mumbai
केंद्रिय मंत्रिमंडळ सचिवांनी नऊ राज्यांच्या आणि एका केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत आज सकाळी साडेदहा वाजता एक व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) आयोजित केली होती. व्हीसीमध्ये सहभागी झालेल्या राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मिर यांसह केंद्रिय आरोग्य सचिव, आयसीएमआरचे महासंचालक आणि नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) यांचा समावेश होता. ही राज्यांतील / केंद्रशासित प्रदेशांमधील कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद रणनितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ही व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती.
केंद्रिय आरोग्य सचिवांनी राज्य / केंद्रशासित प्रदेशांमधील कोविड – 19च्या सद्य स्थितीबद्दल तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जास्त आहे आणि त्यात सुधारणा करण्याविषयी दृष्टिकोन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि चाचण्यांसाठी धोरण आखणे, साथीचे संपर्क शोधणे, देखरेख ठेवणे, प्रतिबंधात्मक उपाय, गृह विलगीकरण, रुग्णवाहिकांची उपलब्धता, रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन, उपचाराच्या पद्धती इत्यादीवर तपशीलवार सादरीकरण केले. असे लक्षात आले आहे की, गेल्या दोन आठवड्यात संपूर्ण देशभरात जेवढे मृत्यू झाले त्याच्या 89 % मृत्यू या 10 राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत, आणि म्हणूनच, ही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सातत्याने आणि कठोर चौकट आखण्याची गरज आहे, जेणेकरून संक्रमणाच्या प्रसारावर निर्बंध येतील आणि तसेच मृत्यू कमी करण्यासाठी पावले उचलली जातील.
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना असे सूचित करण्यात आले आहे की सर्व जिल्ह्यांत मृत्यूची संख्या 1 टक्क्याहून कमी करण्याच्यादृष्टीने कृतीशील पावले उचलण्यास पुढाकार घ्यावा :
1. प्रभावी नियंत्रण, संपर्कांचा शोध आणि देखरेख ठेवणे
2. नव्याने बाधित असलेल्या 80 टक्के रुग्णांमध्ये, सर्व जवळच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे आणि 72 तासांत त्यांची चाचणी केल्याची सुनिश्चितता
3. सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज प्रति दशलक्ष किमान 140 चाचण्या करतांनाच, पॉझिटिव्ह / बाधित रुग्ण संख्येचा दर < 5 % सुनिश्चित करावा
4. बाधित क्षेत्र / आरोग्य क्षेत्रातील अँटीजेन चाचण्या आणि आरटी – पीसीआरसह सर्व निगेटिव्ह लक्षणांची पुनर्तपासणी
5. गृह विलगीकरणातील रुग्णांचे नियमित निरीक्षण (दूरध्वनी आणि घरी भेट देणे) आणि एसपीओ 2 पातळी नियुक्त केलेल्या पातळीपेक्षा खाली आल्यास आरोग्य सेवांमध्ये वेळेवर प्रवेश निश्चित करणे
6. सार्वजनिक क्षेत्रात कोविड सुविधेसाठी बेड आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता ठेवणे तसेच रुग्णवाहिकांच्या प्रतिसादाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करणे
7. सर्व रुग्णांसाठी परिणामकारक वैद्यकीय व्यवस्थापन करून रुग्णांचा जीव वाचविणे
8. अत्यवस्थ रुग्णांना केंद्रस्थानी मानून आरोग्य केंद्रांमध्ये साप्ताहिक पद्धतीने मृत्यू दरावर लक्ष ठेवणे (रुग्ण > 60 वर्ष)
9. रुग्ण संख्येवर आधारित कोविड सर्पित सुविधा श्रेणी सुधारित करणे
10. सर्व सुविधांमध्ये आवश्यक औषधे, मास्क आणि पीपीई किटची उपलब्धता आणि वापर यांचे निरीक्षण करणे
11. कोविडपासून बचावासाठी एकमेकांपासून सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, खोकण्याच्या वेळी करावयाचे शिष्टाचार या गोष्टी जशा व्यवहारात बदलावयाच्या आहेत, त्या व्यवहारातील बदलांचा प्रसार करून प्रोत्साहन देणे.
मुख्य सचिवांना राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील सद्यस्थिती व कोविड 19 च्या प्रसारांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी याबाबत समजावून सांगितले. आव्हानांची पूर्तता करण्यासाठी आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यास आणखी बळकट करण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनीही कोविड बाबत सुरक्षित वर्तनातून मृत्यू दर कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची यावेळी माहिती दिली.
****
B.Gokhale/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649074)
Visitor Counter : 232