PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
27 AUG 2020 7:27PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 27 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांनी येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी युवकांमध्ये उद्योजकतेची जोपासना करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाच्या उद्योजकीय आणि तांत्रिक कौशल्याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि स्वावलंबी होण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मानवतेची सेवा करण्यासाठी आपल्या स्थानिक संसाधनांचा वापर करणे आवश्यक आहे.
कोविड -19 चा संदर्भ देताना उपराष्ट्रपती म्हणाले, या कठीण काळात आपण एकत्रित येऊन प्रयत्न करुया, केवळ विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून नाही तर टाळेबंदीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी गांधीवादी मार्गाने सुकर आणि समाधानाचा मार्ग काढण्याची गरज आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
कोविड – 19 ला धोरणात्मक दृष्टीने प्रतिसाद देताना आणि त्याचे व्यवस्थापन करताना- ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ - या निरंतर आधारभूत चाचणीच्या मुख्य तत्त्वावर भर देण्यात आला, ज्यामुळे लवकर निदान होत आहे. वेळेवर निदान केल्यामुळे बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांना योग्य उपचारांसाठी स्वतंत्रपणे ठेण्याची किंवा रुग्णालयात दाखल करण्याची संधी मिळते. यामुळे मृत्यूदर कमी होतो आणि रुग्ण वेगाने बरे होतात. भारतात रुग्णांच्या चाचण्या आज जवळपास 3.9 कोटींवर पोहोचल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासात 9,24,998 लाख चाचण्या घेण्यात आल्या. यामुळे एकूण चाचणी संख्या 3,85,76,510 पर्यंत वाढली आहे.
इतर अपटेडस:
महाराष्ट्र अपडेटस:
राज्यात बुधवारी 14,888 एवढी उच्च कोरोना रुग्णांची नोंद झाली, यामुळे एकूण रुग्णांची संख्या 7.18 लाखाच्या पुढे गेली. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 1.72 लाख आहे. राजधानी मुंबईत बऱ्याच दिवसानंतर 1,854 रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सरकार ‘चेस दी व्हायरस’ ही मुंबईत यशस्वी ठरलेली रणनिती राज्याच्या इतर भागात अवलंबणार आहे. यात रुग्ण डॉक्टरपर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आरोग्य कर्मचारी लोकांपर्यंत पोहोचतात.
***
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649013)
Visitor Counter : 225