कंपनी व्यवहार मंत्रालय

नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून 3.25 दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्यात एमसीएला पहिले यश

Posted On: 25 AUG 2020 10:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020

पंजाब नॅशनल बँक लि. (पीएनबी) ने कंपनी व्यवहार मंत्रालयाला (एमसीए) माहिती दिली आहे कि त्यांना वसुलीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 3.25 दशलक्ष डॉलर्स  (24.33 कोटी रुपये ) प्राप्त झाले आहेत. यूएस चॅप्टर 11  ट्रस्टीने कर्जदारांच्या मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर, पीएनबीसह असुरक्षित कर्जदात्यांना वितरणासाठी 11.04 दशलक्ष डॉलर्सची ( 82.66 कोटींची) रक्कम  उपलब्ध आहे. त्यानंतरची वसुली इतर खर्चाच्या अधीन आहे आणि इतर दावेदारांच्या दाव्यांचा निपटारा झाल्यावर होऊ शकेल.

परदेशात कॉर्पोरेट फसवणूकीविरूद्धच्या लढाईत कंपनी  व्यवहार मंत्रालयाने  3.25 दशलक्ष डॉलर्सची पहिली परतफेड मिळवणे ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे.

पंजाब नॅशनल बँक लिमिटेडने 2018 मध्ये केंद्र  सरकारच्या कंपनी व्यवहार  मंत्रालयाला माहिती दिली की  नीरव मोदी यांनी मदत केलेल्या तीन कंपन्या मे. फायरस्टार डायमंड, आयएनसी ., मे. ए. जाफी, आयएनसी  आणि मे. फॅन्टॅसी आयएनसी . यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील दक्षिण जिल्ह्यात चॅप्टर 11 दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला होता. पीएनबीने कर्जदारांच्या मालमत्तेवरील दाव्यासाठी मदत करण्यासाठी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील दिवाळखोरीच्या कारवाईला  पाठिंबा देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी  कंपनी व्यवहार मंत्रालयाला विनंती केली होती.

त्यानंतर 24 ऑगस्ट 2018 रोजी न्यूयॉर्क दिवाळखोरी न्यायालयाने  नियुक्त केलेल्या तपासनीसाने  आपला अहवाल सादर केला. अहवालात फसवणूकीची कार्यपद्धती आणि अमेरिकेतील कर्मचा-यांचा या फसवणूकीत सहभाग याचे स्पष्टीकरण दिले आहे.

 

B.Gokhale /S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1648634) Visitor Counter : 170