संरक्षण मंत्रालय

कॅन्टोन्मेंट भागात केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी न राखण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन


कॅन्टोन्मेंटमधील 10,000 कर्मचाऱ्यांसाठी विमा योजनेचा राजनाथ सिंग यांच्या हस्ते शुभारंभ

Posted On: 25 AUG 2020 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑग संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण सामग्री महासंचालनालय (DGDE)  यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या (CSS) अंमलबजावणीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने वेबीनार आयोजित केला आहे. नवी दिल्ली येथे आज 62 देशभरातल्या 65 कंटेनमेंटसाठी आयोजित या वेबिनारचे उद्‌घाटन रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले.

आपल्या उद्‌घाटनपर भाषणात राजनाथ सिंह यांनी सांगितले की, केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ विना व्यत्यय घेता यावा आणि कॅन्टोन्मेंटमधल्या 21लाख रहिवाशांच्या मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने वेबिनार हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री निवारा योजना, स्मार्ट शहरे उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती भोजन योजना यासारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख करून राजनाथ सिंग यांनी सांगितले की कॅन्टोन्मेंट भागात या योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी राहता कामा नयेत. आत्मनिर्भर भारत या मोहिमेत संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारामुळे आयात होणाऱ्या वस्तूंच्या यादीवर प्रतिबंध लागल्याचे सांगितले. तसेच पुढील आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने नवनिर्मितीचे सरकारकडून स्वागत असल्याचे सांगितले.

सर्व 62 कँटोनमेंट बोर्डचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासंचालक या दोन दिवसांच्या वेबिनारमध्ये सहभागी होत आहेत. केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, त्यासाठीचा निधी पुरवठा आणि कॅटोनमेंट भागातील रहिवाशांसाठी त्याद्वारे जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचे मार्ग समजून घेता यावेत या उद्देशाने वेबिनार आयोजित केला आहे. गृहबांधणी आणि शहरी व्यवहार मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय यामधील संयुक्त सचिव नोडल अधिकारी या वेबिनारमध्ये सहभाग घेत आहेत. संबंधित राज्य कार्य संचालक, संबंधित राज्य विभागांचे मुख्य साचिव हे सुद्धा वेबिनारमध्ये सहभागी होत आहेत.

केंद्र पुरस्कृत योजनांचा परीघ वाढवणे आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे कन्टोनमेंट भागांपर्यंत पोहोचता यावेत यासाठी प्रत्येक कँटोन्मेंट बोर्डला या योजना पुढे नेण्याच्या दृष्टीने या वेबिनारमधील चर्चासत्रे उपयुक्त ठरतील.

 ‘छावणी कोविड : योद्धा संरक्षण योजना’ या जीवन विमा निगमतर्फे असलेल्या समूह विमा जीवन विमा योजनेचाही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी शुभारंभ केला. या योजनेमुळे सर्व 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड मधल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेशी सामना करण्यासाठी पाच लाखांचे विमा कवच मिळेल. या योजनेचा लाभ  डॉक्टर आणि पॅरामेडिक्स, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना होईल.

 

B.Gokhale /V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648583) Visitor Counter : 187