वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृषी आणि संबधित क्षेत्रांतील विविध संस्थांनी समन्वयाने काम करावे या उद्देशाने APEDA ने एएफसी इंडिया यांच्याशी सामंजस्य करार केला
Posted On:
25 AUG 2020 4:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020
कृषी आणि प्रक्रिया खाद्य उद्योग निर्यात विकास संस्था(APEDA), या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थेने एएफसी इंडिया लिमिटेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (NCUI), दिल्ली यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. या संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असुन, त्यांनी त्यांची कुशलता एकत्रित आणि परस्पर सहकार्यांने वापरली आहे या संस्था कृषी आणि संबधित क्षेत्रातील संबधितांना जास्त मूल्य मिळवून द्यावे या उद्दिष्टांनी कार्यरत करतात.
APEDA ही वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संबंधित नानाविध उपक्रम आणि संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांतून, त्यांचे त्या त्या क्षेत्रातील अधिकाराचा उपयोग करून कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहे. कृषी निर्यात धोरण हे शेतकरी केंद्रित आहे. ज्यामुळे प्रथमस्थानीच किंमत वाढवून सुधारित उत्पन्न मिळवण्याच्या प्रक्रियेतून पुढील मूल्य साखळीत कमीत कमी तोटा उरेल आणि या द्वारे उत्तम कृषी केंद्र व्यवस्था वापरली जाईल.
AEP साठी APEDA विविध राज्यांबरोबर प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, तामिळनाडू, आसाम, पंजाब, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मणिपूर आणि सिक्कीम यांनी यासाठी राज्यनिहाय कृती योजना निश्चित केली आहे तर इतर राज्यांत कृती योजना निश्चित होण्याच्या विविध टप्प्यावर आहेत.
APEDA ने राज्यगणिक क्षेत्रनिहाय वीस समित्या नेमल्या आहेत. पंजाब, युपी (दोन जिल्हे) यात बटाटे उत्पादन क्षेत्रात, राजस्थान मध्ये इसबगोल, महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात संत्री, डाळिंब, द्राक्ष आणि केळी , तामिळनाडू व केरळात केळी उत्पादनासाठी, उत्तर प्रदेशात आंब्यासाठी, गुजरात व उत्तर प्रदेश मध्ये दुग्ध उत्पादनासाठी, कर्नाटकात गुलाब तसेच कांद्यांसाठी उत्तर प्रदेशात ताज्या भाज्यांसाठी मध्यप्रदेशात संत्र्यांसाठी तर गुजरात मध्ये बटाट्यासाठी या समित्या स्थापन झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर APEDA ने एएफसी इंडिया लिमीटेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे.
दिवाकर नाथ मिश्रा अध्यक्ष, ए पी डी ए आणि बी गणेशन व्यवस्थापकीय संचालक AFC India Ltd. (पूर्वीची कृषी निधी कॉर्पोरेशन) यांनी ह्या सामंजस्य करारावर सह्या केल्या.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648493)