रेल्वे मंत्रालय

‘फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन’च्या प्रगतीचा रेल्वे आणि वाणिज्य, उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आढावा


सर्व कंत्राटदारांच्या कामाचे काटेकोर निरीक्षण करण्याचे निर्देश

Posted On: 24 AUG 2020 6:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य, उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मालवाहतुकीसाठी समर्पित असलेल्या फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल)च्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिका-यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. पश्चिम कॉरिडॉरला जोडणा-या उत्तर प्रदेशातल्या दादरी ते मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट- जेएनपीटी या पट्टयाचे काम तसेच पूर्व कॉरिडॉरच्या पंजाबातल्या लुधियानाजवळच्या सहनेवाल ते पश्चिम बंगालमधील डंकुनी या मार्गाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

कोविड-19 महामारीमुळे टाळेबंदीच्या काळामध्ये झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मंत्री पीयूष गोयल यांनी दिले. तसेच कामातली आव्हाने लक्षात घेवून मिशन मोडवर उपाय योजण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले. कामासाठी उत्साही तसेच ताज्या दमाचे, नवा विचार करणा-या लोकांना प्रोत्साहन द्यावे, असे गोयल यांनी सांगितले.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) हा भारत सरकारने हाती घेतलेला सर्वात मोठा पायाभूत प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 81,459 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

M.Iyangar/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648251) Visitor Counter : 189