आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताने आतापर्यंत सुमारे 3.6 कोटी चाचण्या केल्या
प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांनी (टीपीएम) देखील 26,016 च नवा उच्चांक नोंदवला
Posted On:
24 AUG 2020 4:31PM by PIB Mumbai
बाधित रुग्णांची वेळेवर आणि आक्रमक चाचण्यांच्या माध्यमातून ओळख पटवणे हा कोविड 19 महामारीला भारताने दिलेल्या प्रतिसादाचा मुख्य घटक राहिला आहे. त्वरित निदान आणि प्रभावी उपचारांसह अलगीकरण यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि कोविड 19 मुळे मृत्युदर घटत आहे.
भारताने आतापर्यन्त 3,59,02,137 चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासांत 6,09,917 चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दिशेने भारताची आगेकूच सुरु आहे.
देशभरातील निदान प्रयोगशाळा नेटवर्कच्या विस्तारामुळे चाचण्या करणे सुलभ झाले असून जास्तीत जास्त चाचण्या करणे शक्य झाले आहे. यामुळे प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांची संख्या (टीपीएम) 26,016.वर पोहचली आहे. प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांची संख्या (टीपीएम) सातत्याने वाढत आहे.
“कोविड -19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना समायोजित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष” या मार्गदर्शक निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सल्ल्यानुसार दररोज प्रति दशलक्ष चाचण्यांमध्येही वाढ झाली आहे.
देशात नैदानिक प्रयोगशाळांच्या राष्ट्रीय नेटवर्कमधील वाढ हे चाचणी रणनीतीचे द्योतक आहे. आज देशात 1520 प्रयोगशाळा असून सरकारी क्षेत्रात 984 प्रयोगशाळा आणि 536 खासगी प्रयोगशाळा आहेत. . यामध्ये
• रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 785 (सरकारी : 459 + खाजगी: 326 )
• ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 617 (शासकीय: 491 + खाजगी: 126)
• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 118 ((सरकारी: 34 + खासगी: 84)
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
M.Iyangar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648197)
Visitor Counter : 296