पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाने ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) व फिकी लेडीज ऑर्गनायझेशन (FLO) शी आभासी पद्धतीने केला समझोता करार
Posted On:
21 AUG 2020 10:20PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हाद सिंग पटेल यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या दोन संस्थांशी महिलांच्या सबलीकरणाच्या दिशेने टिकाऊ उपजीविकेसाठी पर्यटन व्यवसायाचे एक प्रतिरूप (model) विकसित करण्यासाठी एक समझोता करार आभासी पद्धतीने करण्यात आला.
या कराराद्वारे TAAI व FLO आदरातिथ्य क्षेत्रातील व्यक्तिगत कौशल्य, कामाचा लवचिक समतोल व उद्योजकतेच्या वाढत्या संधी कमीत कमी भांडवली गुंतवणुकीतून मिळवण्यावर भर देण्यात आहेत.
खास महिलांसाठी पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षण व कौशल्य विकास करणारे उपक्रम सुरू करण्याची गरज असल्याचे पटेल यांनी पुढे सांगितले.
यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांचाही समावेश केला जाणे आवश्यक असून महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल सजग करून त्यांच्या राहत्या वस्ती अथवा समुदायातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास त्यांना प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पर्यटनाच्या विकासासाठी पुढाकार घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे केवळ पर्यटन क्षेत्राचाच फायदा होणार नसून महिलांच्या सबलीकरण व प्रगतीसाठीही ते सहाय्यभूत ठरेल.
पर्यटन क्षेत्रातील 'होम स्टे' म्हणजेच गृह निवास, पर्यटकांना सुविधा देणारे कर्मचारी, केटरिंग व्यवसाय, इत्यादी अनेक बाबतीत महिला उत्तम कामगिरी करू शकतील. पर्यटन मंत्रालय, TAAI व FLO यांच्यातील समन्वय व सहकार्याच्या एका नवीन पर्वाला या करारामुळे सुरुवात होईल.
पर्यटन व्यवसायामुळे महिलांना उपजीविकेचे एक टिकाऊ साधन मिळून त्या आर्थिक विकास कसा साधू शकतील याबद्दल महिलांचे प्रबोधन करण्यासाठी TAAI व FLO च्या राज्यस्तरावरील शाखा, राज्य पर्यटन विभाग व राज्य पर्यटन महामंडळ एकत्रितपणे काम करतील.
यावेळी सर्व प्रतिनिधींनी 'देखो अपना देश' अंतर्गत देशातील 15 पर्यटन स्थळांना भेट देण्याची प्रतिज्ञा केली.
या संयुक्त उपक्रमांतर्गत खालील मुद्दे प्रस्तावित आहेत:
1. 'देखो अपना देश' उपक्रमा अंतर्गत देशातील कमीत कमी 15 पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करणे. TAAI व FLO च्या सदस्य असलेल्या आठ हजार महिला व त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे बंधनकारक असेल.
2. प्रत्येक राज्यातील एका महत्त्वाच्या पर्यटन स्थळ किंवा स्मारक स्थळावर समुदाय आधारित पर्यटन भेटी आयोजित करणे. यामध्ये पर्यटन मार्गदर्शक ( टूर गाईड )चे काम, स्वतः बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केंद्रे, स्वतः बनवलेल्या कलाकृतींची विक्री केंद्रे चालवणे, तसेच सर्व ठिकाणचे जमाखर्च ठेवून या पर्यटन स्थळाची एकूणच सर्व व्यवस्था केवळ महिलाच बघतील.
3. पर्यटन सुविधा देणे हा व्यवसाय महिलांसाठी टिकाऊ उपजीविकेचे तसेच सबलीकरणाचे महत्वपूर्ण साधन कशा रीतीने होऊ शकतो, ते समजावून देण्यासाठी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे. त्यासाठी शैक्षणिक कार्यशाळा तसेच गटचर्चा आयोजित करण्याचे काम TAAI व FLO च्या राज्यस्तरीय शाखा करतील.
4. खाद्यपदार्थ हाताळताना घ्यायची काळजी, आरोग्य व स्वच्छता, परिसर स्वच्छता, पर्यावरण, पाककौशल्य, उद्योजकता इत्यादींबद्दल महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी पर्यटन कार्यशाळा आयोजित करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांशी सहयोग करणे.
5. 'अतिथी देवो भव' या बोधवाक्याबद्दल महिलांना संवेदनशील करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, पर्यटन व्यवसाय संस्था तसेच इतर संस्थांमार्फत कार्यशाळा आयोजित करणे
6. ग्रामीण भागात तसेच शहरात 'होम स्टे' अर्थात गृह निवास उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू करून त्यांच्यासाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणे.
7. 'अतुल्य भारत पर्यटन सुविधा' देणाऱ्या व्यावसायिकांसाठी असलेल्या प्रमाणपत्र कार्यक्रमाविषयी जागरुकता निर्माण करणे.
या उपक्रमासाठी पर्यटन मंत्रालय खालील प्रकारे पाठिंबा देईल:
◆ या समझोता करारानुरूप FLO व TAAI ने चालू केलेल्या उपक्रमांचे समर्थन व जाहिरात करणे
◆ पर्यटन मंत्रालयाच्या बोधचिन्हासहित FLO व TAAI ची बोधचिन्हे वापरणे.
◆ मार्गदर्शन व सकारात्मक हस्तक्षेप.
◆ सुयोग्य संपर्क स्थापित करून सुविधा देणे.
****.
B.Gokhale/U.Raikar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647797)
Visitor Counter : 172