ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

उत्पादकाचा तपशील, समाप्तीची तारीख, किंमत आणि उत्पादनाचा इतर तपशील सर्व उत्पादनांच्या पॅकेजेसवर स्पष्टपणे द्यावा- रामविलास पासवान

Posted On: 21 AUG 2020 10:06PM by PIB Mumbai

 

 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले, उत्पादकाचा तपशील, समाप्तीची तारीख, एमआरपी आणि उत्पादनाचा इतर तपशील सर्व उत्पादनांच्या वेष्टणावर स्पष्ट वाचता येईल असा द्यावा. कोणत्याही उत्पादनाच्या पॅकेजवर अपूर्ण माहिती आढळल्यास ग्राहकांनी तक्रारी नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, यामुळे गैरप्रकार करणाऱ्या आणि निकृष्ट प्रतीचा माल विकण्यास आळा बसेल.

व्हिडीओ पत्रकार परिषेद्वारे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, ‘सेडर ओम (Seder OM) या औषधाच्या वितरकाविरोधात गुंटूर, आंध्र प्रदेशात वैध मापन विभागाने तक्रार नोंदवली आहे. पासवान यांनी माहिती दिली की, या उत्पादनावर उत्पादकाचे नाव, हेल्पलाईन क्रमांक आणि समाप्तीची तारीख नमूद करण्यात आली नव्हती. तसेच घोषणा केलेल्या मजकूराचा आकार 1 मिमिपेक्षा कमी होता आणि तो या औषधाच्या वेष्टणावर स्पष्टपणे वाचता येत नव्हता. ते म्हणाले वैधमापन कायदा 2009 मधील कलम 15 नुसार डिस्ट्रीब्युटर आणि दुकानदारावर छापा टाकून या औषधाची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.      

****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647795) Visitor Counter : 137