उपराष्ट्रपती कार्यालय
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींच्या जनतेला शुभेच्छा
Posted On:
21 AUG 2020 8:45PM by PIB Mumbai
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी जनतेला एका संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांचा संदेश खालीलप्रमाणे आहे.
गणेश चतुर्थीच्या मंगल प्रसंगी मी माझ्या देशातील जनतेला शुभेच्छा देत आहे. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे धाकटे पुत्र समजले जाणारे भगवान गणेश बुद्धीमत्ता, समृद्धी आणि चांगले भाग्य यांचे प्रतीक मानले जातात. आपण कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी भगवान गणेशाची आराधना करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो.
गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा जन्मोत्सव साजरा करणारा दहा दिवसांचा उत्सव आहे. या उत्सवात नेहमीच मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात आणि मिरवणुका निघतात. दरवर्षी लोक त्यांच्या घरांमध्ये भगवान गणेशांच्या अतिशय सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना करतात आणि अतिशय भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. या मूर्तींचे विसर्जन म्हणजे दहाव्या दिवशी भगवान गणेशाचा कैलासाच्या दिशेने प्रवास सुरू होतो आणि या उत्सवाची सांगता होते.
भव्य मिरवणुका आणि मोठमोठे कार्यक्रम ही या उत्सवाची ओळख असली तरी यंदा कोविड-19 च्या महामारीचा फैलाव लक्षात घेऊन आपल्याला हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची गरज लक्षात घेतली पाहिजे. मी माझ्या देशवासीयांना असे आवाहन करत आहे की त्यांनी हा उत्सव साजरा करत असताना कोविड-19च्या वैयक्तिक अंतराच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन करावे. ही गणेश चतुर्थी आपल्या देशात शांतता, सद्भावना आणि समृद्धी घेऊन येवो.
M.Chopade/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647749)
Visitor Counter : 190