आदिवासी विकास मंत्रालय

अर्जुन मुंडा यांनी देशभरातील 31 शहरांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘ट्राईब्स इंडिया ऑन व्हील्स’ मोबाइल व्हॅनना हिरवा झेंडा दाखवला

Posted On: 19 AUG 2020 3:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज देशभरातील  31 शहरांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘ट्राईब्स  इंडिया ऑन व्हील्स’  मोबाइल व्हॅनना  हिरवा झेंडा दाखवला. आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका प्रमुख अतिथी  म्हणून उपस्थित होत्या. ट्रायफेडचे अध्यक्ष रमेश चांद मीना आदिवासी कल्याण  मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर आणि ट्रायफेडचे  व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा उपस्थित होते. सुरुवातीला मुंबई, अहमदाबाद, अलाहाबाद, बंगळुरू, भोपाळ, चेन्नई, कोईमतूर, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जगदलपूर, खूंटी आणि रांची आदी  शहरांमध्ये 57 मोबाइल व्हॅनना रवाना करण्यात आले.

यावेळी बोलताना अर्जुन मुंडा म्हणाले की, या कठीण काळात जेव्हा  कोविड -19 महामारीने विविध प्रकारे जीवन प्रभावित केले असताना  लोक आरोग्यदायी राहणीमान  आणि शक्य तितके सुरक्षित राहण्यावर भर देत आहेत. सेंद्रिय, तसेच नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी घराबाहेर न पडता देखील शाश्वत व सर्वांगीण जीवनशैलीचा अवलंब करता येईल हे ट्रायफेडच्या या अभिनव  पुढाकाराने सुनिश्चित केले आहे . 'गो वोकल फॉर लोकल' हा सध्याच्या संकटकाळातला मंत्र 'गो व्होकल फॉर लोकल गो ट्रायबल' या रूपात बदलत तसेच सध्याचे प्रमुख कार्यक्रम आणि अंमलबजावणी व्यतिरिक्त, अनेक चाकोरीबाहेरचे मार्ग स्वीकारत ट्रायफेड   व्यथित आणि पीडित आदिवासींची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मोबाईल व्हॅनच्या या अभिनव उपक्रमामुळे ट्रायफेड  आता  हा माल थेट विविध ठिकाणी ग्राहकांकडे घेऊन जात आहे तोदेखील त्याच किंमतीत. विक्रीची सर्व रक्कम थेट आदिवासींकडे जाईल आणि त्यांचे उत्पन्न आणि  उदरनिर्वाह कायम  ठेवण्यास मदत करेल.

रेणुका सिंग सरुता यांनी आपल्या भाषणात सांगितले कि या कठीण काळात, महामारी विविध प्रकारे आपले जीवन प्रभावित करत असताना लोक आरोग्यदायी राहणीमान  आणि शक्य तितके सुरक्षित राहण्यावर भर देत आहेत. सेंद्रिय, तसेच नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी घराबाहेर न पडता देखील शाश्वत व सर्वांगीण जीवनशैलीचा अवलंब करता येईल हे ट्रायफेडच्या या अभिनव  पुढाकाराने सुनिश्चित केले आहे . हा उपक्रम ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना मदत करेल.

आर.सी. मीना यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रभावित आदिवासींचे (कारागीर आणि वनवासी) पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने ट्रायफेडने  'ट्राइब्स  इंडिया ऑन व्हील्स' सुरू केले असून आदिवासींच्या उन्नतीच्या दिशेने ट्रायफेड योद्ध्यांच्या  पथकाचा हा आणखी एक सर्जनशील प्रयत्न आहे.

प्रवीर कृष्णा म्हणाले की ट्रायबल्स इंडिया ऑन व्हील्स हा निसर्गाचे औदार्य  तुमच्या दारात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या मोबाइल व्हॅनमुळे नैसर्गिक आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी आदिवासी उत्पादने उदा -सेंद्रिय  हळद, सुका आवळा, जंगली मध, काळी मिरी, नाचणी, त्रिफळा आणि मूग डाळ, उडीद डाळ आणि पांढरी बीन्स सारख्या डाळी पुढील काही महिन्यात थेट ग्राहकांच्या दारापर्यंत उपलब्ध होतील.  उत्पादनांच्या विक्रीला गती देण्यासाठी ट्रायफेड व्यवसाय भागीदारांशीही करार करत आहे.

ट्राईब्स इंडिया ऑन व्हील्स हा ट्रायफेड वॉरियर्सच्या चमूचा आणखी एक सर्जनशील प्रयत्न आहे. आदिवासींच्या उन्नतीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

देशभरात महामारीने लोकांच्या जीवनात थैमान घातल्याला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. लोक आपले जीवन आणि  जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत असताना आदिवासींचे उत्पन्न व उदरनिर्वाह टिकवून ठेवण्यासाठी ट्रायफेड योद्धांचे पथक प्रयत्न करत आहे.

 

अचानक उद्‌भवलेली महामारी आणि तत्काळ लॉकडाऊनमुळे आदिवासी कारागिरांचा कोट्यवधी रुपयांचा साठा विक्रीविना  पडून होता. या साठ्याची विक्री करण्यासाठी आणि विक्रीची सर्व रक्कम बाधित आदिवासी कुटुंबांकडे जावी या उद्देशाने ट्रायफेडने  आपल्या ट्राईब्स इंडिया संकेतस्थळ आणि अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि जीईएम सारख्या अन्य किरकोळ मंचावर विक्री न झालेल्या वस्तूंचे ऑनलाईन (भरीव सवलत देत) विपणन करण्यासाठी आक्रमक योजना सुरू केली आहे.

आत्मनिर्भर अभियानाच्या घोषणेला अनुसरून ट्रायफेड आदिवासी उत्पादक-वनवासी आणि कारागीर यांच्या एमएफपी, हस्तकलेच्या वस्तू आणि हातमाग वस्तू खरेदीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी खास ई-बाजारपेठ सुरू करणार आहे. ट्राइब इंडिया ई-मार्ट प्लॅटफॉर्म ही आदिवासींसाठी ई-शॉपच्या माध्यमातून ई-मार्केट प्लेसमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना आपला माल विकण्यासाठी एकछत्री  सुविधा असेल.  ट्रायफेड देशभरातील अंदाजे 5 लाख आदिवासी उत्पादकांची नोंदणी करण्याच्या  आणि त्यांच्याकडून नैसर्गिक उत्पादन व हस्तकलेच्या वस्तू तयार  करून  घेण्याच्या प्रक्रियेत आहे.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646931) Visitor Counter : 165