संरक्षण मंत्रालय

कर्टन रेझर- नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स 2020

Posted On: 18 AUG 2020 9:14PM by PIB Mumbai

 

नौदलाच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची परिषद यंदा नवी दिल्लीत उद्यापासून सुरु होत आहे. 21 ऑगस्टपर्यंत चालणारी ही परिषद नौदल कमांडर्स यांच्यातील सर्वोच्च पातळीवरील चर्चासत्र असते. नौदलप्रमुख आणि कमांडर इन चीफ यावेळी या वर्षभरात झालेल्या नौदलाच्या विविध कारवाया, लॉजिस्टिक, मनुष्यबळ, मटेरियल, प्रशिक्षण आणि प्रशासाकीय कामे या सर्व क्षेत्रांचा आढावा घेतील. आणि भविष्यातील योजनांविषयी चर्चा करतील.

भारताच्या उत्तर सीमेवर अलीकडेच झालेल्या काही घटना आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेली आव्हाने यांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद, अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कोविडनंतरच्या बदललेल्या जगात, नौदलाच्या कारवाया, मालमत्तेचे व्यवस्थापन, खरेदीविषयक मुद्दे, पायाभूत सुविधा विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन या सर्वच बाबींविषयी नव्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यासाठी, ही परिषद नौदलाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देईल.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी संरक्षण मंत्री नौदल कमांडर्स ना मार्गदर्शन करतील. या परिषदेत कमांडर्स आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांदरम्यान देखील चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

लष्करी व्यवहार विभाग Department of Military Affairs (DMA)  हे कार्यालय आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केल्यानंतरची ही पहिलीच नौदल परिषद  आहे.

या परिषदेमध्ये, संयुक्त अभ्यासाने, तिन्ही सैन्यदलाची एकत्रित उर्जा आणि कार्यवाहीसाठीची तत्परता, कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यपद्धतीची पुनर्रआखणी, यावर चर्चा आणि विचारविनिमय होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  सागर ( सुरक्षा आणि प्रदेशातील सर्वांचा उत्कर्ष) या अभियानाच्या अनुषंगाने, या परिषदेत, भारत-प्रशांत महासागर प्रदेशातील व्यापक सुरक्षा अभियानाविषयी देखील चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1646815) Visitor Counter : 234