गृह मंत्रालय

पंडित जसराज जी यांचे निधन म्हणजे वैयक्तिक नुकसान - अमित शाह


पंडित जसराज त्यांच्या अद्वितीय निर्माणामुळे आपल्या ह्रदयात कायम राहतील - अमित शाह

Posted On: 17 AUG 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्वीट संदेशात अमित शाह म्हणाले, “संगीत मार्तंड पंडित जसराज जी एक अतुल्य कलाकार होते, त्यांनी आपल्या जादुई आवाजाने भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध केले. त्यांचे निधन म्हणजे वैयक्तिक नुकसान झाल्यासारखे आहे. त्यांचे कुटुंबीय आणि अनुयायांप्रती सहवेदना. ओम शांती”.

पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायकांपैकी होते. पंडित जसराज यांना 2000 मध्ये, देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म विभूषणने गौरवण्यात आले होते.

 

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646559) Visitor Counter : 134