अल्पसंख्यांक मंत्रालय

"कोरोना कालावधी हा भारतासाठी ‘काळजी, वचनबद्धता आणि आत्मविश्वास’ चा सकारात्मक काळ असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्याने जगभरातील मानवतेसाठी एक उदाहरण स्थापित केले आहे” : मुख्तार अब्बास नक्वी


मंत्रालयांतर्गत एनएमडीएफसीतर्फे होली फॅमिली हॉस्पिटल, नवी दिल्ली यांना सीएसआर अंतर्गत मोबाइल क्लिनिक प्रदान केले

हे आपत्कालीन मल्टी पॅरा मॉनिटर, ऑक्सिजन सुविधा आणि ऑटो लोडिंग स्ट्रेचरसह सुसज्ज आहे, जे कोणत्याही आपत्कालीन रूग्णांसाठी आवश्यक आणि जीवन रक्षक सुविधा आहे

अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित 1500 हून अधिक आरोग्य सहाय्यक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत करत आहेत : मुख्तार अब्बास नकवी

"देशभरातील 16 हज हाऊस राज्य सरकारांना कोरोना बाधित लोकांसाठी विलगीकरण आणि अलगीकरण सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत."

Posted On: 17 AUG 2020 1:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

"कोरोना कालावधी हा भारतासाठी ‘काळजी, वचनबद्धता आणि आत्मविश्वास’ चा सकारात्मक काळ असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्याने जगभरातील मानवतेसाठी एक उदाहरण स्थापित केले आहे”, असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.  

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाने (एनएमडीएफसी) होलि फॅमिली हॉस्पिटल, नवी दिल्ली यांना दिलेली अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा असलेल्या मोबाईल क्लिनिकचे उद्घाटन करताना नक्वी म्हणाले की, या कालावधीत लोकांच्या आयुष्यात आणि त्यांच्या जीवनशैली आणि कार्य संस्कृतीत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. लोकं आता समाजाप्रती सेवा आणि आपली जबाबदारी पार पडण्यासाठी अधिक वचनबद्ध झाले आहेत.

कोरोना साथीच्या काळात लोकांची उत्कट बांधिलकी व सरकारच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे भारत आरोग्य क्षेत्रामध्ये वेगाने आत्मनिर्भर झाला आहे असे नक्वी म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयांना आरोग्य ओळखपत्र (आयडी) देण्यात येईल.राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणेल. एका व्यक्तीची, प्रत्येक आजाराची, कोणत्या डॉक्टरांनी कोणते औषध दिले याची माहिती तसेच सर्व चाचण्या, अहवाल, ही सर्व माहिती या एका आरोग्य आयडीमध्ये असतील. ”

नक्वी म्हणाले की जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना "मोदी केअर" ने लोकांच्या आरोग्याची हमी दिली आहे. “मोदी केअर” योजने अंतर्गत देशातील जवळपास 40 टक्के लोकसंख्येचा समावेश आहे.

अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित  1500 हून अधिक आरोग्य सहाय्यक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत करत आहेत असे नक्वी म्हणाले. 

देशभरातील 16 हज हाऊस राज्य सरकारांना कोरोना बाधित लोकांसाठी विलगीकरण आणि अलगीकरण सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

नक्वी म्हणाले की, सीएसआर कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या एनएमडीएफसी द्वारे प्रदान केलेले मोबाइल क्लिनिक गरीब, दुर्बल घटकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी होली फॅमिली हॉस्पिटल, नवी दिल्लीद्वारे चालविले जाईल. हे आपत्कालीन मल्टी पॅरा मॉनिटर, ऑक्सिजन सुविधा आणि ऑटो लोडिंग स्ट्रेचरसह सुसज्ज आहे, जे कोणत्याही आपत्कालीन रूग्णांसाठी आवश्यक आणि जीवन रक्षक सुविधा आहे

एनएमडीएफसीने युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या उपचारासाठी, मोहालीतील संरक्षण मंत्रालयाच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरला सुधारित स्कूटर, फिजिओथेरपी वैद्यकीय उपकरणे व इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली आहेत, अशी माहिती नक्वी यांनी यावेळी दिली.


* * *

U.Ujgare/S.Mhatre/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646393) Visitor Counter : 182