रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रलयाकडून बांधकाम उपकरणे आणि वाहनांच्या मसुद्यात सुधारणा संदर्भात सूचनांसाठी निमंत्रण

Posted On: 16 AUG 2020 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बांधकाम उपकरणे आणि वाहने यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या उपकरणांच्या चालकाची सुरक्षिततेची तरतूद करण्यासाठी आणि इतर वाहनांसह सार्वजनिक रस्त्यावर अशी वाहने धावतानांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 13 ऑगस्ट 2020 च्या जीएसआर 502 (इ) अन्वये या वाहनांच्या सुरक्षिततेसंदर्भात वाहन अधिसूचना जारी केली आहे. 

सद्यस्थितीला, सीएमव्हीआर 1989 नुसार बांधकाम उपकरणाच्या वाहनांसाठी काही सुरक्षितता आवश्यकता आधीच अनिवार्य केल्या आहेत. एआयएस (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड) 160 नुसार व्हिज्युअल डिस्प्ले, ऑपरेटर स्टेशन आणि देखभाल क्षेत्र, नॉन-मेटलिक इंधन टाकी, मिनिमम ऍक्सेस डायमेन्शन आणि ऍक्सेस सिस्टम यासारख्या अनेक अतिरिक्त सुरक्षा आवश्यकतांची ओळख करुन देणे हा या मानकचा हेतू आहे.

या संदर्भातील सूचना किंवा अभिप्राय  सहसचिव, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली -100001 (ईमेल: jspb-morth[at]gov[dot]in) यांना मसुदा सूचना जारी केल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत पाठवता येतील.

 

 

D.Wankhede/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646285) Visitor Counter : 141