गृह मंत्रालय
अमली पदार्थ विरोधी ब्रिक्स कार्यसमूहाची चौथी बैठक पार पडली
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी अधिवेशनासाठी पाच सदस्य देशांची पुष्टी स्वीकारली
ब्रिक्स देशांमधील वास्तविक वेळ माहिती सामायिक करण्यासाठी भारताने केली मध्यवर्ती केंद्रांची मागणी
मादक द्रव्यांच्या वाहतुकीसाठी अंधाराचा गैरफायदा न घेण्यावर आणि प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर न करण्यावर बैठकीत लक्ष केंद्रित
Posted On:
16 AUG 2020 1:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020
ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स अँटी ड्रग वर्किंग ग्रुपचे चौथे सत्र या आठवड्यात पार पडले. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी केले. रशियाच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यंदाचे सत्र पार पडले. ब्रिक्स राज्यांमधील अमली पदार्थांच्या स्थितीसंबंधी मतांची फलदायी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनधिकृत पद्धतीने होणारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या पद्धती, मानसिक संतुलन बिघडविणारे पदार्थ आणि त्यांचे पूर्वगामी तसेच परिस्थितीवरील विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांचा होणारा परिणाम शिखर परिषदेत चर्चेत आला. चर्चेदरम्यान उद्भवलेल्या समान मुद्यांमध्ये सदस्य देशांमधील वास्तिविक माहिती सामायिक करणे आणि सागरी मार्गांद्वारे वाढलेल्या अमली पदार्थांच्या वाहतुकीवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. अंधाराचा गैरफायदा आणि अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी इतर प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर हे या बैठकीचे प्रमुख मुद्दे होते.
सदस्य देशांनी एक आज्ञापत्र स्वीकारले आहे, ज्यामध्ये बैठकीत चर्चा झालेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश होता.
D.Wankhede/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646265)
Visitor Counter : 257