रसायन आणि खते मंत्रालय

जनऔषधी केंद्रांमधून वंचित महिलांना किमान एक रुपये दराने 5 कोटीहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटपः पंतप्रधान

Posted On: 15 AUG 2020 8:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, त्यांचे सरकार देशातील महिला विशेषत: वंचित महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेची खूप काळजी घेत आहे.

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की सरकार गरीब मुली-भगिनींच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत असून त्यांना स्वस्त दरात आरोग्यविषयक उत्पादने उपलब्ध करुन दिली जात आहेत. या दिशेने काम करीत असतानाच 6000 जन औषधि केंद्रामधून वंचित महिलांना किमान एक रूपये दराने 5 कोटी पेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

पंतप्रधानांच्या घोषणेविषयी बोलताना केंद्रीय रसायन व खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा म्हणाले की पंतप्रधानांच्या सतत मार्गदर्शन व पाठबळामुळे हे यश मिळाले आहे. 6000 जन औषधि केंद्रांचे जाळे हे विशेषतः वंचित लोकांची सेवा करण्यासाठी तयार करण्यात आले आहे जिथे आम्ही किमान एक रुपये दराने 5 कोटी सॅनिटरी पॅडचे वितरण केले.

पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी आम्ही पंतप्रधान जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून आवश्यक आणि दर्जेदार औषधे परवडणाऱ्या दरात सतत उपलब्ध करत राहू यावर गौडा यांनी जोर दिला.

विशेषत: महिलांचे सक्षमीकरण आणि गरीबांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या दृढ वचनबद्धतेमुळे विविध क्षेत्रात जलद प्रगती शक्य झाली आहे असे नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले. आमचे औषधनिर्माण विभाग पंतप्रधान जन औषधी केंद्रांमार्फत परवडणाऱ्या किंमतीला सॅनिटरी पॅड आणि इतर औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

सामाजिक मोहीम म्हणून जन औषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन देशभरातील 6000 हून अधिक पंतप्रधान भारतीय जनौषधी परियोजना - पीएमबीजेपी केंद्रांवर किमान 1 रुपये दराने सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध आहे. अशाच सॅनिटरी नॅपकिन्सचा बाजारभाव प्रति पॅड सुमारे 3 रुपये ते 8 रुपये आहे.

सरकारच्या या पावलाने देशातील वंचित महिलांसाठी स्वच्छता, स्वास्थ्य आणि सुविधासुनिश्चित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनाला यशस्वी करण्यासाठी केंद्रीय औषधनिर्माण विभागाने हे पाऊल उचलले आहे. हे सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरणास अनुकूल आहेत, कारण एएसटीएम डी-6954 (बायोडिग्रेडिबिलिटी टेस्ट) मानकांचेपालन करून हे पॅड्स ऑक्सो-बायोडिग्रेडेबल माल वापरून तयार केले आहेत.

देशातील बर्‍याच भागांत विशेषत: ग्रामीण भागात मुली आणि स्त्रियांना सॅनिटरी उत्पादने सहज उपलब्ध हॉट नाहीत किंवा बाजारात उपलब्ध असणार्‍या बहुतेक वस्तू महाग असतात म्हणूनच या महिला त्या वापरत नाहीत. जन औषधी केंद्रांमध्ये हे पॅड्स उपलब्ध झाल्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

जन औषधि केंद्रांनी जम्मू-काश्मीर आणि लदाख प्रदेशालाही 1.56 कोटी पॅडचा पुरवठा केला आहे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमचा भाग म्हणून एनएचएम तरुण मुली आणि महिलांना या पॅड्स मोफत वाटप करीत आहेत.

******

B.Gokhale/‍S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646190) Visitor Counter : 200