शिक्षण मंत्रालय

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत – स्वतंत्र भारत या विषयावर निबंध सादर करण्याची तारीख 23 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविली

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2020 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020

 

देशातील स्वातंत्र्य दिन साजरा होण्यापूर्वी, मनुष्यबळ विकास मंत्रालय मायगव्ह च्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांच्या विशिष्ट वयोगटासाठी (नववी ते दहावी किंवा माध्यमिक टप्पा आणि अकरावी ते बारावी किंवा उच्च माध्यमिक) देशभर ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करीत आहे. आत्मनिर्भर भारत – स्वतंत्र भारत या विषयावरील निबंध स्पर्धेसाठी निबंध पाठविण्याची तारीख मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 23 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविली आहे. या उपक्रमासाठी एनसीईआरटी ही मध्यवर्ती संस्था असेल.

"आत्मनिर्भर भारत – स्वतंत्र भारत" या मुख्य विषयांतर्गत निबंध लेखनासाठी उपविषय पुढील प्रमाणे आहेत :

1.    आत्मनिर्भर भारतासाठी भारतीय राज्यघटना आणि लोकशाही ही सर्वांत मोठी सक्षमता आहे.

2.    75 व्या वर्षातला स्वतंत्र भारत – आत्मनिर्भर भारताच्या दिशेने निघालेले राष्ट्र

3.    एक भारत श्रेष्ठ भारतद्वारे आत्मनिर्भर भारत : विविधतेत एकतेतून नाविन्य वाढ

4.    डिजीटल भारत : कोविड – 19 आणि त्या पलिकडील संधी

5.    आत्मनिर्भर भारत : राष्ट्र विकासात विद्यार्थ्यांची भूमिका

6.    आत्मनिर्भर भारत – लिंग, जात आणि वांशिक पक्षपातापासून स्वातंत्र्य

7.    आत्मनिर्भर भारत – जैव-विविधता आणि कृषी समृद्धीद्वारे नव्या भारताची निर्मिती

8.    आत्मनिर्भर भारताचा आरंभ करताना माझा हक्क बजावण्याबरोबरच माझे कर्तव्य बजावणे मी निश्चितच विसरणार नाही.

9.    माझी शारीरिक तंदुरुस्ती ही माझी संपत्ती आहे जी आत्मनिर्भर भारतासाठी मानवी भांडवल तयार करेल.

10 . आत्मनिर्भर भारतासाठी सागर ते हरिततेची  जपणुक 

विद्यार्थी त्यांच्या प्रवेशिका 23 ऑगस्ट 2020 पूर्वी येथे भराव्यात..

https://innovate.mygov.in/essay-competition

 

* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1645970) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Tamil , Telugu