रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मणिपूरमधील 13 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि रस्ता सुरक्षा प्रकल्पाचे गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2020 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
ईशान्येकडील मणिपूर राज्यातील 13 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि रस्ता सुरक्षा प्रकल्पाचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी, 17 ऑगस्ट, 2020 रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे या आभासी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (सेवानिवृत्त) व्ही.के. सिंग, अनेक खासदार, आमदार आणि केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत 316 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होणार असून त्याचा बांधकाम खर्च सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. या रस्त्यांमुळे मणिपूरच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे; त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यात चांगली जोडणी, सुविधा आणि आर्थिक विकास होईल.
प्रकल्पामध्ये अंतर्भाव गोष्टींच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1645776)
आगंतुक पटल : 215