रसायन आणि खते मंत्रालय

राष्ट्रीय औषधोत्पादन मूल्य प्राधिकरणाच्या तत्वाधना अंतर्गत मूल्य निरीक्षण आणि स्रोत युनिट स्थापन

Posted On: 13 AUG 2020 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

कर्नाटकमध्ये केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालय, औषधोत्पादन विभाग, राष्ट्रीय  औषधोत्पादन मूल्य प्राधिकरणाच्या (एनपीपीए)  तत्वाधना अंतर्गत मूल्य निरीक्षण आणि स्रोत युनिट (पीएमआरयु) ची  स्थापन करण्यात आली आहे.

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी ट्विटरवरून याची घोषणा केली.

एनपीपीएचा विस्तार वाढविण्यासाठी राज्य औषध नियंत्रकाच्या थेट देखरेखीखाली पीएमआरयू राज्यस्तरावर कार्य करेल. पीएमआरयू सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था असतात ज्यांचे स्वतःचे ज्ञापनपत्र / उपविधी असतात. पीएमआरयूच्या संचालक मंडळामध्ये केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि इतर भागधारकांचा समावेश आहे.

एनपीपीएने ग्राहक जागरूकता, प्रसिद्धी आणि किंमत देखरेख (सीएपीपीएम) या केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत केरळ, ओडिशा, गुजरात, राजस्थान, हरियाणा, नागालँड, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, मिझोरम आणि जम्मू आणि काश्मीर या 12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात पीएमआरयू स्थापन केले आहेत. सर्व 36 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएमआरयु स्थापन करण्याची एनपीपीए ची योजना आहे. एनपीपीए या योजनेंतर्गत पीएमआरयुचे आवर्ती आणि अनावर्ती खर्च दोन्ही खर्च करते.

आतापर्यंत राष्ट्रीय  औषधोत्पादन मूल्य प्राधिकरणा (एनपीपीए) चे मुख्यालय फक्त दिल्ली येथे आहे आणि आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएमआरयूच्या स्थापनेनंतर एनपीपीएचा  राज्य स्तरावरही विस्तार होईल.

एनपीपीएला औषधांच्या किंमतींच्या निरीक्षणासाठी मदत करणे, औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि ग्राहक जागरूकता वाढविणे हे पीएमआरयूचे प्राथमिक कार्य आहे. पीएमआरयू स्थानिक स्तरावर माहिती गोळा करणार्‍या यंत्रणे सोबत एनपीपीएचे सहयोगी म्हणून काम करतात. ते एनपीपीए आणि संबंधित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित राज्य औषध नियंत्रकांना आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान करतील.

कोविड प्रोटोकॉल अंतर्गत एचसीक्यू, पॅरासिटामोल, लस, इंसुलिन आणि औषधे यासह जीवनावश्यक औषधांची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात एनपीपीए राज्य सरकारांसोबत सहकार्य करीत आहे. देशभरात औषधांची कमतरता भासू नये यासाठी एनपीपीएने राज्य सरकारांसह एकत्र काम करत प्रयत्न केले आहेत. पीएमआरयुने प्रादेशिक स्तरावर औषध सुरक्षा बळकट करणे अपेक्षित आहे. 

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645602) Visitor Counter : 201