गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जागतिक युवा दिनानिमित्त शुभेच्छा


“कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आणि संपत्ती म्हणजे युवक. प्रचंड महत्वाकांक्षा आणि कौशल्यांनी भरलेल्या युवाशक्तीबाबत भारत सुदैवी”

“कुशल आणि उत्साही युवकांमध्ये आलेल्या संधीचा योग्य वापर करण्याची शक्ती”

“मोदी सरकार कुशल भारत, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया आणि एनईपीच्या माध्यमातून युवकांच्या अफाट क्षमतांना संधी देण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे”

“मला खात्री आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवा सातत्याने प्रयत्न करतील”

Posted On: 12 AUG 2020 4:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीट संदेशात ते म्हणतात, “कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आणि संपत्ती म्हणजे युवक. प्रचंड महत्वाकांक्षा आणि कौशल्यांनी भरलेल्या युवाशक्तीबाबत भारत सुदैवी आहे. मला खात्री आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत संकल्पनेची पूर्ती करण्यासाठी ते सतत प्रयत्नरत राहतील”.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “कुशल आणि उत्साही युवकामध्ये आलेल्या संधीचा योग्य वापर करण्याची शक्ती आहे”.

अमित शाह पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्कील इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) माध्यमातून  युवकांच्या अफाट क्षमतांना संधी देण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले  आहे”.

Greetings on #InternationalYouthDay.

The greatest strength and asset of any nation is its youth. India is truly blessed to have a youth power filled with tremendous ambitions and skills. I am sure that they will continue to strive towards PM @NarendraModi’s vision of #NewIndia.

— Amit Shah (@AmitShah) August 12, 2020

Skilled & enthused youth have the power to make the best of the opportunities on their way. PM @NarendraModi ji’s govt with its decisions like Skill India, Start-Up India, Make in India & NEP has been constantly creating an ecosystem to unlock the immense potential of our youth.

— Amit Shah (@AmitShah) August 12, 2020

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645351) अभ्यागत कक्ष : 159