निती आयोग
अटल इनोव्हेशन मिशन आणि डेल टेक्नॉलॉजीजने सुरू केला विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0
Posted On:
11 AUG 2020 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2020
अटल टिंकरिंग लॅबच्या (एटीएलएस) तरूण संशोधकांसाठी अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोग यांनी डेल टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने आज विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0 (एसईपी 2.0) सुरू करण्यात आला.
एसईपी 1.0 च्या अभूतपूर्व यशानंतर, लगेचच याच्या दुसऱ्या भागाचा प्रारंभ नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, डेल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अलोक ओहरी, एआयएमचे मिशन संचालक आर रामानन आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. अंजली प्रकाश यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
``एटीएलच्या तरुण आश्वासक संशोधकांकडून निर्माण होणाऱ्या अभिनव कल्पना पाहिल्यामुळे आज मी पूर्ण आशावादी आहे. नागरिकांकडून येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना वेगळ्या पद्धतीचा विचार करण्याची संधी तरुणांना दिल्यास या देशातील तरूण मुले काय करू शकतात, या त्यांच्या नवकल्पनांनी मला आश्चर्यचकित केले आहे. एसईपी 1.0 चा समारोप करताना आणि एसईपी 2.0 ला प्रारंभ करताना यातील संशोधनाचे देशावर काय परिणाम दिसतील, याबाबत मी खूप उत्सुक आहे,`` असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार म्हणाले.
एसईपी 2.0 मुळे विद्यार्थी संशोधकांना डेलच्या प्रतिनिधींच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना मार्गदर्शकांचा पाठिंबा मिळेल, नमुना आणि तपासणीसाठी प्रोत्साहन आणि अंतिम वापरकर्ता अभिप्राय, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि कल्पनांचे पेटंट करून घेणे, प्रक्रिया आणि उत्पादने, उत्पादनासाठी प्रोत्साहन तसेच बाजारपेठेत उत्पादन प्रारंभ करताना देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे.
डेल टेक्नॉलॉजीजचे भारतातील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अलोक ओहरी म्हणाले, ``विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे अनुभव मिळावेत, यासाठी, सक्षम बनविण्यासाठी, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग डेल करीत आहे. ज्यायोगे त्यांना एक नाविन्यपूर्ण मानसिकता विकसित करण्यास सक्षम केले जात आहे. पहिल्या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमाच्या निकालामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि पुढच्या बॅचच्या साठ्यात काय आहे, याची आता आम्हाला उत्सुकता आहे. नीती आयोगासह असलेल्या आमच्या मजबूत भागीदारीमुळे आम्हाला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी, तांत्रिकदृष्ट्या दृष्टीकोन विस्तारित करण्यासाठी अधिक सक्षम केले आहे.``
या समारंभ प्रसंगी बोलताना एआयएम मिशनचे संचालक आर. रामानन म्हणाले, ``अटल इनोव्हेशन मिशनच उद्दिष्ट देशातील दहा लाख नवनवीन नवनिर्मिती आणि संभाव्य रोजगार निर्मिती करणारे आहे. डेल टेक्नॉलॉजीज बरोबर भागीदारी म्हणजे अटल टिंकरिंग लॅबच्या तरुण संशोधकांच्या, शाळेतील आकांक्षावादी विद्यार्थ्यांच्या उद्योजकता विषयक क्षमतांना विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमातून उत्तेजन देणे हे आहे, तसेच ही भागीदारी देशभरातील नाविन्यपूर्ण प्रतिभेसाठी मूल्यवर्धक ओळख व्यासपीठ तयार करते.``
एसईपी 1.0 ची सुरवात जानेवारी 2019 मध्ये झाली. 10 महिन्यांच्या कठोर कार्यक्रमाच्या माध्यमातून एटीएल मॅरेथॉनचे देशभरातील सर्वोत्तम 6 संघांचे विद्यार्थी देशभरात सामाजातील आव्हानांना सामोरे गेले आणि तळागाळात संशोधन केले आणि त्यावरील उपायांनी त्या एटीएलएस ना त्यांच्या अभिनव नमुन्यांची पूर्णपणे कार्यक्षम उत्पादनांमध्ये रुपांतरित करण्याची संधी मिळाली, जी आता बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
एटीएल मॅरेथॉनच्या शेवटच्या हंगामात तब्बल 1500 संशोधकांनी नाविन्यपूर्ण माहिती सादर केली. दोन कठीण फेऱ्यांनंतर 50 विद्यार्थ्यांची संशोधक प्रकल्पासाठी निवड झाली. विजयी संघांपैकी 75 टक्क्यांपेक्षा जास्त गट श्रेणी – 2 शहरे आणि ग्रामीण भागातील आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त सरकारी शाळांमधील होते. साधारणपणे विजयी संघांच्या 46 टक्के संघांमध्ये मुलींचा समावेश होता. त्यानंतर अटल इन्क्युबेशन सेंटरद्वारे विद्यार्थी संशोधन कार्यक्रम 2.0 च्या माध्यमातून काही महिन्यांसाठी या संघांना मार्गदर्शन केले गेले. परिणामी अव्वल 8 संघांचा 14 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वोत्तम 8 असलेले विद्यार्थी आता त्यांचे नमुने एसईपी 2.0 मार्गे उत्पानाच्या दिशेने नेतील.
एआयएम मिशन संचालक आर. रामानन यांनी सहा संघांचे अभिनंदन केले आहे. ``गेल्या काही महिन्यात, उद्योजक होण्यासाठी आपण आपले चातुर्य आणि योग्यता दर्शविली आहे. आपल्या चिकाटीमुळे आपण आपल्या स्वतःच्या स्टार्टअप्स आणि उपक्रमांचे `सह-संस्थापक` बनू शकता. यातच खरे आत्मनिर्भर भारताचे सार आहे.``असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, यासारख्या उद्योगाच्या भागीदारीमुळे तरुण विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचे पालनपोषण करणे कठीण आहे आणि ते आपल्या स्वतःसाठी एक चांगले स्थान बनविण्यास सक्षम ठरतील.
* * *
B.Gokhale/S.Sheikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645181)
Visitor Counter : 327