रसायन आणि खते मंत्रालय

गौडा यांनी एचयुआरएलच्या तीन आगामी प्रकल्पांच्या प्रगतीचा घेतला आढावा


या प्रकल्पांमुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता 38.1 लाख मे.टननी वृद्धिंगत होईल – गौडा

Posted On: 11 AUG 2020 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीत गोरखपूर, बरौनी आणि सिंदरी येथील हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन मर्यादित (एचआरयूएल) च्या आगामी तीन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

एचआरयूएलचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार गुप्ता यांनी तिन्ही प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल संक्षिप्त सादरीकरण केले आणि सांगितले की गोरखपूर, सिंदरी आणि बरौनी प्रकल्पांनी आतापर्यंत क्रमशः  80%, 74% आणि 73% प्रगती केली आहे. लॉकडाऊन, प्रवास निर्बंध आणि कामगारांची अनुपलब्धता या सगळ्याचा प्रकल्पाच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. परिस्थिती आता सुधारली आहे आणि पूर्व कोविडपेक्षा 20% कमी परंतु पुरेसे मनुष्यबळ एकत्रित करून तिन्ही ठिकाणचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. हे प्रकल्प कार्यान्वीत व्हायला निर्धारित मुदतीपेक्षा 5 ते 6 महिन्यांचा अधिक कालावधी लागेल परंतु पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत हे तिन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे काम पूर्ण करण्यात जो विलंब झाला आहे त्याची भरपाई करण्यासाठी आक्रमक योजना तयार करण्याची आवश्यकता असल्याचे गौडा यांनी सांगितले. 

प्रवास निर्बंध अजून काही काळ असाच राहील त्यामुळे परदेशातील तज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सल्लामसलत करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. तिन्ही प्रकल्प स्थळी काम पुन्हा सुरु करण्यासाठी एचयुआरएलच्या व्यवस्थापनाने केलेल्या प्रयत्नांबद्दल गौडा यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुढील वर्षाच्या अखेरीस हे तीन प्रकल्प चालू झाल्यावर देशांतर्गत क्षमता 38.1 लाख मे.टन वाढेल आणि त्याद्वारे यूरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरता वृद्धिंगत होईल. हे प्रकल्प सुरु झाल्यानंतर देशाची आयात कमी होईल, परकीय चलन बचत, शेकडो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती, सरकराला कर इत्यादींच्या बाबतीत देशाला फायदा होईल.

कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल), एनटीपीसी लिमिटेड (एनटीपीसी) आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांनी संयुक्त उद्यम कंपनी म्हणून 15 जून 2016 रोजी हिंदुस्तान उर्वरक व रसयन लिमिटेड (एचयुआरएल) ची स्थापना केली. एचयुआरएलच्या माध्यमातून भारत सरकार गोरखपूर, सिंदरी आणि बरौनी येथे एफसीआयएल आणि एचएफसीएलच्या तीन बंद यूरिया कारखान्यांचे पुनरुज्जीवन करीत असून प्रत्येकाची वार्षिक क्षमता 12.7 लाख मे.टन आहे.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645179) Visitor Counter : 197