सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

वस्त्रनिर्यात दुपटीने वाढवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ‘वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेने’ उपाययोजना कराव्यात- नितीन गडकरी


जागतिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाची उत्पादने द्यावीत- गडकरी

प्रत्येक योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी डिजिटल व्यवस्थापन, प्रकल्प अंमलबजावणीतील दिरंगाई कमी टाळण्यासाठी आणि तक्रार निवारणाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प आढावा घेतला जाईल- नितीन गडकरी

Posted On: 11 AUG 2020 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

वस्त्रप्रावरणांची निर्यात दुपटीने वाढवण्यासाठी वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वस्त्रांचा दर्जा वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि संशोधन अद्ययावत करावे आणि जागतिक बाजारपेठेत किमतीबाबत स्पर्धात्मक दृष्टीकोन ठेवावा, असा सल्लाही त्यानी दिला. वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद आणि MSME क्षेत्राने संयुक्तपणे आयोजित केलेल्या आभासी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. एमएसएमई क्षेत्रात तरलता आणि तणाव व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या पैकेजच्या माध्यमातून या उद्योगांना पाठिंबा देण्याचे काम सरकार करत आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.

तसेच उत्पादनांचा दर्जा तपासण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा शिबीरे आणि डिजाईनसाठी साठी एक केंद्र सथापन करण्याची गरज आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.  

त्याशिवाय, वस्त्रोद्योग क्षेत्रात बांबूसारख्या मूळ संसाधनांचा वापर करण्यावर भर दिला जावा, अशी सूचना त्यांनी केली. एमएसएमई क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील सहभाग आणि रोजगाराच्या विपुल संधी, विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागात या क्षेत्रांचे महत्व लक्षात घेऊन, वस्त्रप्रावरण क्षेत्राने या भागात या व्यवसायाचे समूह तयार करावेत आणि या भागात रोजगार तसेच विकासाला चालना देण्यात हातभार लावावा, असे गडकरी म्हणाले.

उत्तम काम आणि निर्यातीचा उत्तम दर्जा कायम राखण्यासाठी वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद करत असलेल्या कामांचे गडकरी यांनी कौतुक केले. मात्र, त्यात आणखी सुधारणा करता येतील, असेही ते म्हणाले.

या कार्यशाळेत एमएसएमई आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.


* * *

M.Jaitly/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645097) Visitor Counter : 121