गृह मंत्रालय

कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि गेल्या सहा वर्षांपासून मोदी सरकार तो  बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे


शेतकर्‍यांच्या उत्पन्नात आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक अभूतपूर्व पावले उचलण्यात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आगामी काळात भारतीय कृषी जागतिक दर्जाची बनेल. ”

"कृषी पायाभूत विकास निधी " शीतगृह साखळी, संकलन केंद्र, प्रक्रिया युनिट सारख्या अनेक पायाभूत प्रकल्पांच्या निर्मितीला गती देईल जेणेकरून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचे खरे मूल्य मिळेल.

"कृषी पायाभूत  विकास निधी " रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था देखील मजबूत करेल.

Posted On: 09 AUG 2020 10:48PM by PIB Mumbai

 

कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी 'पीएम किसान ' अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 कोटी रुपये हस्तांतरित केल्याबद्दल आणि 1,00,000 कोटी रुपयांचा "कृषी पायाभूत  विकास निधी " सुरु केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

अमित शहा यांनी ट्वीटच्या मालिकेत म्हटले आहे की, “कृषी पायाभूत विकास निधी शीतगृह साखळी, संकलन केंद्र , प्रक्रिया युनिट सारख्या अनेक पायाभूत प्रकल्पांच्या निर्मितीला गती देईल जेणेकरून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांना  त्यांच्या उत्पादनाचे खरे मूल्य मिळेल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, “कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि गेल्या सहा वर्षांपासून मोदी सरकार त्याला  बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.   अमित शहा यांनी भर दिला की "शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक अभूतपूर्व पावले उचलण्यात आली  आहेत". केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे म्हणाले  की, “मला खात्री आहे की पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय शेती आगामी काळात जागतिक दर्जाची बनेल. ”.

कृषि भारतीय अर्थव्यवस्था की नींव है, जिसको सशक्त करने के लिए मोदी सरकार 6वर्षों से प्रयासरत है। किसानों की आय दोगुना करने और कृषि विकास के लिए कई अभूतपूर्व कदम उठाए हैं। मुझे विश्वास है कि पीएम @narendramodi जी के इन अथक प्रयासों से आने वाले समय में भारतीय कृषि विश्वस्तरीय होगी।

— Amit Shah (@AmitShah) August 9, 2020

कृषि व ग्रामीण क्षेत्र के विकास के लिए आज @NarendraModi जी ने कैबिनेट द्वारा पारित ₹100000 Cr के Agriculture Infrastructure Fund की शुरुआत की और साथ ही PM-Kisan के तहत 8.5 Cr किसानों के खातों में ₹17000 Cr की राशि ट्रांसफ़र की, इसके लिए प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूँ।

— Amit Shah (@AmitShah) August 9, 2020

Agriculture Infrastructure Fund से कोल्ड स्टोरेज, संग्रह केंद्रों, प्रसंस्करण इकाइयों जैसे अनेकों बुनियादी ढाचों के निर्माण को गति मिलेगी जिससे हमारे मेहनती किसान अपनी उपज का सही मूल्य प्राप्त कर पाएंगे। इससे रोजगार के नये अवसर उत्पन्न होंगे और ग्रामीण अर्थव्यवस्था भी मजबूत होगी।

— Amit Shah (@AmitShah) August 9, 2020

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1644671) Visitor Counter : 153