रेल्वे मंत्रालय

रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री, पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज , कोळसा आणि खाण मंत्री  प्रल्हाद जोशी यांनी आज हुबळी येथील रेल्वे संग्रहालय राष्ट्राला केले समर्पित


“रेल्वेने आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यात वैयक्तिक जीवनाचा साक्षीदार राहिला  आहे. वाफेचे युग ते आधुनिक बुलेट ट्रेन युगापर्यंतच्या रेल्वेच्या उत्क्रांतीची कहाणी उल्लेखनीय आहे. त्या असाधारण  बदलांना रेल्वे संग्रहालय श्रद्धांजलीचे स्मारक आहे. ”- पीयूष गोयल

Posted On: 09 AUG 2020 10:38PM by PIB Mumbai

 

रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्रीपीयूष गोयल आणि संसदीय कामकाज , कोळसा आणि खाण मंत्री  प्रल्हाद जोशी यांनी आज .09 ऑगस्ट  2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हुबळी येथील रेल्वे संग्रहालय राष्ट्राला समर्पित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे राज्यमंत्री  सुरेश सी. अंगडी आणि इतर मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना  पीयूष गोयल म्हणाले, “रेल्वेचा आपल्या सर्वांशी भावनिक संबंध आहे. आपल्या आयुष्यात रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यात आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रवासांचा साक्षीदार राहिला आहे.  त्यांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, गांधीजींनीही रेल्वेच्या माध्यमातून भारत समजून घेणे पसंत केले. रेल्वे स्वतःच अनेक बदलांमधून गेली आहे. वाफेचे  युग ते आधुनिक बुलेट ट्रेन युगापर्यंत रेल्वेच्या उत्क्रांतीची कहाणी खरोखर उल्लेखनीय आहे. त्या विलक्षण परिवर्तनाचे स्मारक हे संग्रहालय आहे. कोविड नंतरच्या युगात जाताना  बरेच बदल दिसतील. संग्रहालय सामायिक इतिहास आणि संस्कृतीबद्दल समाजाला संवेदनशील करण्यात मदत करेल. आपण हा ठेवा आणि आठवणी जपायला हव्यात. आम्ही आता रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरण आणि 100% हरित  बनवित आहोत. ही जागतिक दर्जाची प्रवासी आणि मालवाहतूक सेवा संस्था असेल. रेल्वेत  बदल आणि परिवर्तन होत  राहील. वारसा महान राहील आणि सतत जतन करणे आवश्यक आहे.

त्यांनी नमूद केले की रेल्वेने 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारत मध्ये योगदान देण्याचा संकल्प केला आहे.

 

संग्रहालयाची ठळक वैशिष्ट्ये:

रोलिंग स्टॉकची गॅलॅक्सि

मालप्रभा आणि घटप्रभा कॉटेज

थिएटर कोच

सुरुची कॅफेटेरिया

टॉय ट्रेन

स्मरणपत्रे दुकान

तिकीट छपाई यंत्र

मॉडेल ट्रेन

.•  मुलांसाठी जागा

 

प्रवेशद्वारावरील भव्य कमान  पूर्वकालीन काळात आपले स्वागत करते. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अग्रदूतांच्या प्रतीकांनी सुशोभित केलेले, ज्यानी  दक्षिण मराठा  रेल्वे, म्हैसूर इत्यादी भागाची सेवा केली आहे, स्वागत कमान अभ्यागतांना रेल्वेचे जग शोधण्याचा  इशारा करते.

आउटडोअर लँडस्केपः दोन अरुंद गेज इंजिन (ट्रेन इंजिन) संग्रहालयात मुख्य आकर्षण आहे. ट्रॅकवर चालणारी आणि रोलिंग स्टॉक (इंजिन), कोच, वॅगन, टँकर, रेल्स, स्लीपर्स, लेव्हल क्रॉसिंग गेट, सिग्नल यासारख्या सर्व प्रदर्शनांचा समावेश हिरवळीच्या पार्श्वभूमीवर केला आहे. 

देशातील विविध भागातील प्रवाश्यांच्या भव्य आकाराच्या पुतळ्यांसह विविधतेत एकतादर्शविणारा एक अरुंद गेज कोच पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण आहे.

घटप्रभा कॉटेज: हे कॉटेज प्राचीन काळातील भव्यता घरातील कलाकृतींचे घरगुती संग्रह परिभाषित करतात. घटप्रभा कॉटेजमध्ये धावती ट्रेन, सिग्नल इंस्ट्रूमेंट्स इ. सह मॉडेल रूम आहे. इंजिन, वॅगन, कोच यांच्यासह  प्राचीन पुस्तके आणि झाडांचा इतिहास आहे. वैद्यकीय आणि सुरक्षा मोर्चात रेल्वेच्या कामकाजाचे ठसे पाहिले जाऊ शकतात. मजेशीर गोष्टींसह मुलांसाठी रंगीबेरंगी  कक्ष देखील घटप्रभाचा एक भाग आहे. स्मृतिचिन्हे खरेदी करता येतील असा एक स्मारक काउंटर आणि एका  कॉटेजमध्ये रेल्वे कंपन्यांचा इतिहास दर्शवणारा इतिहास कोपरा आहे .

मालप्रभा कॉटेज: मालप्रभाच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर कोळशाच्या रेखाटनांची  आर्ट गॅलरी तयार केली आहे.  तिकीट काउंटर, मुद्रित तिकिटे, लोखंडी कॅश चेस्ट बुकिंग कार्यालय काही दशकांपूर्वीच्या तिकीटांची आठवण करून देतात.  पॅनेल, सर्व उपकरणे, रजिस्टर, फर्निचर आणि स्टेशन मास्टर आणि पॉइंट्स मॅन यांच्या भव्य पुतळ्यांसह स्टेशन मास्टर रूमची प्रतिकृती केली आहे. प्राचीन  फर्निचरसह वेटिंग रूमच्या संकल्पनेवर  एक  खोली तयार केली गेली आहे.150 वर्ष जुन्या पार्सल वेईन्ग मशीनसह पार्सल ऑफिस सेटअप देखील तयार केला आहे.

तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने पर्मनंट  वे, रेल, स्लीपर, ट्रॅक फिटिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल वस्तुकणही उत्क्रांती आणि प्रगतीची माहिती संग्रहालयात दाखविण्यात आली आहे.

थिएटर आणि रेस्टॉरंट कोचेससह  प्लॅटफॉर्मः अलंकृत खांब असलेले एक भव्य प्लॅटफॉर्म रेस्टॉरंट कार आणि थिएटर कारमध्ये प्रवेश प्रदान करते. छोटे लघुपट  आणि व्हिडिओ मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही असून . कोच  थिएटरमध्ये त्यांच्या निश्चित वेळांचे नियोजन केले आहे.

टॉय ट्रेनमध्ये राइडः स्टीम इंजिनवर चालणाऱ्या  रंगीबेरंगी वाहनांमुळे मुले आणि वडीलधारी दोघांनाही मजा येईल. हुबळी  वर्कशॉपमध्ये टॉय ट्रेन तयार केली आहे.  ध्वनी आणि स्टीम इफेक्टसह सुसज्ज अशा या टॉय ट्रेनमध्ये बोर्डिंग आणि फेरफटका  पर्यटकांना जुन्या काळाची आठवण करून देतो

सुरुची कॅफेटेरिया: अभ्यागतांच्या रसना  तृप्त करण्यासाठी संग्रहालयात  सरुचि कॅफेटेरियाची सोय असून  सौंदर्यदृष्ट्या डिझाइन केलेल्या बाह्य भागात प्राचीन खांबासह प्रादेशिक व्यंजने उपलब्ध आहेत.

या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे सामग्री आणि मनुष्य शक्ती एकत्रित करून सर्वकाही उपलब्ध स्त्रोतांद्वारे केले जात आहे.

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर  संग्रहालयात अभ्यागतांसाठी प्रवेश एकावेळी केवळ 30 सदस्यांपुरता  मर्यादित ठेवला  आहे. संग्रहालयात भेट देताना वारंवार सॅनिटायझर डिस्पेंसर वापरुनमास्कचा बंधनकारक वापर व सामाजिक अंतर राखण्याची पर्यटकांना  विनंती केली जाईल. लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल होईपर्यंत आणि परिस्थिती सामान्य होई पर्यंत थिएटरचा कोच बंद राहील.

 

11 ऑगस्ट 2020 पासून संग्रहालयासाठी नियमित कामकाजाची वेळ  खालीलप्रमाणे आहे-.

l सामान्य दिवस (मंगळवार ते शुक्रवार) दुपारी 12 ते सायंकाळी 7

 

शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुटीचे दिवस-  दुपारी 12 ते रात्री 8

प्रत्येक सोमवारी सुट्टी राहील

 

प्रवेश तिकीट शुल्क

 प्रौढ (12 वर्षापेक्षा जास्त) रु. 20 / -

 

लहान मूल (5-12 वर्षे) रु  10 / -

 5 वर्षांपेक्षा कमी विनामूल्य

 

थिएटर कोच

शो ची वेळ  (दर तासाला दुपारी 12.00 ,1 ,  2   3   4 , 5 )

10  सदस्यांच्या गटासाठी प्रत्येक तिकिट रु.10/

 

शो चा कालावधी -  15 मि

 

टॉय ट्रेनचे तिकिट (एक ट्रिप )

प्रत्येकि तिकिट INR 10 / -

* तीन फेऱ्यांची एक ट्रिप

*****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644668) Visitor Counter : 117