PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
09 AUG 2020 8:03PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 9 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- एक नवीन उच्चांक स्थापन करत , भारताने एकाच दिवसात 7 लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात 6 लाखाहून अधिक चाचण्या सुरू ठेवल्यामुळे भारताच्या चाचण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 7,19,364 चाचण्या घेण्यात आल्या. अशा सर्वाधिक चाचण्यामुळे दररोज बाधित रुग्ण आढळण्याची संख्याही झपाट्याने वाढेल. मात्र राज्यांना व्यापक शोध मोहीम, त्वरित अलगीकरण आणि प्रभावी उपचारांवर भर देतानाच टेस्ट, ट्रॅक , ट्रीट या केंद्र-प्रणित रणनीतीचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ज्या राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे अशा राज्यांबरोबर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. अशा भरीव कामगिरीचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे . काल एका दिवसात सर्वाधिक 53,879 कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले. याबरोबरच बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 14,80,884 वर पोहोचली आहे. उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे (आज 6,28,747) बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या 2.36 पटीने अधिक असून हा नवा उच्चांक आहे. सक्रिय रुग्ण घरी अलगीकरणात किंवा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
मुंबईनजीकच्या रायगड जिल्ह्यातील पेण उत्कृष्ट गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, कोविड संक्रमण आणि टाळेबंदीचा मुर्ती कारागिरांना फटका बसला आहे. मुर्तींची स्थानिक मागणी 40% आणि निर्यात मागणी 60% नी कमी झाल्याचे कारागिरांनी सांगितले. तथापी, महाराष्ट्रात कोविड रुग्णसंख्येने 5 लाखांचा टप्पा गाठला, संख्या 5.03 लाखांवर पोहचली. शनिवारी 12,822 रुग्णांची नोंद झाली.
FACT CHECK



***
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644627)
Visitor Counter : 210