रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या नवीन युगाची पहाट: विकासाला चालना देण्यासाठी रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांची मालिका

Posted On: 07 AUG 2020 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020

जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या नवीन युगाची पहाट: विकासाला चालना देण्यासाठी रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांची मालिका या शीर्षकांतर्गत ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसार भारती मंडळाचे सदस्य अशोक टंडन यांच्या लेखाचा मजकूर खालीलप्रमाणे:

 भारतीय जन संघाचे संस्थापक (सध्याच्या भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नाव) डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याचे भारतात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी देशव्यापी सत्याग्रह (अहिंसक आंदोलन) करत आपल्या प्राणांची आहुती दिली.

डॉ. मुखर्जी यांनी 10 मे 1953 रोजी एक देश में दो विधान, दो प्रधान आणि दो निशान नहीं चलेंगे (एका देशात दोन राज्यघटना, दोन पंतप्रधान आणि दोन झेंडे असू शकत नाही) असा नारा देत जम्मू-काश्मीर सीमेवर सरकारच्या प्रवेश-परवान्याच्या आदेशाचा भंग केला होता आणि या घटनेनंतर त्यांना अटक अटक करण्यात आली होती.

त्यांना श्रीनगर कारागृहात नेण्यात आले तिथे 23 जून 1953 रोजी त्यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला.

त्यावेळी डॉ. मुखर्जी यांना कदाचित हा विचार देखील केला नसेल, की त्यांच्याच पक्षाचे गुजरातमधील दुसऱ्या पिढीतील एक नेते पक्षात संपूर्ण बहुमताने सरकार स्थापन करतील तेव्हा त्यांचे हे ध्येय साध्य होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 370 अन्वये जम्मू-काश्मीर राज्याला दिलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केला जेणेकरून जम्मू-काश्मीर मधील लोकांना केंद्र सरकारच्या सर्व कार्यक्रमांचा आणि किमान वेतन कायदा व अल्पसंख्याक कायदा याशिवाय दिव्यांगाना आरक्षणाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि माहितीच्या अधिकारासह सर्व कायद्यांचा लाभ मिळू शकेल.

राज्याला देण्यात आलेल्या स्वायत्ततेच्या सर्व तरतुदी रद्द करण्याच्या राष्ट्रपतींच्या ऐतिहासिक आदेशानंतर धोरणात्मक दृष्ट्या आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत राज्य पुनर्गठन अधिनियम, 2019 अंतर्गत राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन करण्यात आले.

जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्र शासित प्रदेश (जम्मू-काश्मीर कायमचे नाही) म्हणून आता थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून, मोदी सरकारने संपूर्ण प्रदेशात सर्वसमावेशक विकास आणि पारदर्शक कारभाराच्या नव्या युगाची सुरुवात करणारा शांतता आणि प्रगतीचा महत्वाकांक्षी मार्ग विस्तारित केला आहे.

सर्व-हवामान टिकून राहणारे चांगले दर्जेदार रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या विकासामुळे आंतर-प्रदेश आणि आंतर-क्षेत्रीय दळणवळणातील सर्व अडथळे दूर झाले आहेत; राज्याचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशात केल्यानंतरच्या काळात रोजगार निर्मिती आणि चालना देण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

गेल्या एक वर्षात दिलेल्या आश्वासनांचे प्रदेश-निहाय लेखापरीक्षण केल्यानंतर बऱ्यापैकी चांगले परिणाम दिसून आले आहेत असे असले तरी या संपूर्ण सुंदर प्रदेशाचे परिवर्तन तिथे सध्या सुरु असलेले सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विशेषतः अत्यंत बिकट हवामान परिस्थिती देखील आपली कार्यक्षमता टिकून ठेवणाऱ्या खडतर प्रदेशातील बोगद्यांसह धोरणात्मक दृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम पूर्ण झाल्यावर दिसून येईल.

 काश्मीर: ऋषी कश्यपांची भूमी :

काश्मीरवरील अनेक पुस्तकांचे लिखाण करणारे लेखक आणि प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन संशोधक क्रिस्तोफर सनेडन यांच्या म्हणण्यानुसार हे नाव कश्यप मीर (ऋषी कश्यपाचे तलाव) याच्या नावाचे लघुरूप असू शकते.

आणि प्रसिद्ध भारतीय सूफी कवी आणि अभ्यासक अमीर खुसरो यांनी काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन खालील शब्दांत केले होते:

अगर फिरदौस बर रु-ए ज़मीन अस्त,

हमीन अस्तो हमीन अस्तो हमीन अस्त

(जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे तर तो इथे आहे, इथे आहे.)

पर्यटन ही नेहमीच काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा ठरली आहे आणि सुधारित पायाभूत सुविधा या खोऱ्यातील निर्यातीस चालना देण्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरत आहेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय बीआरओ आणि राज्य पीडब्ल्यूडीशी समन्वय साधून आपल्या एनएचएआय आणि एनएचआयडीसीएल सारख्या बळकट संघटनांच्या माध्यमातून सध्या अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात गुंतले आहेत जे विकासाला गती देतील आणि रेशीम पालन,  थंड पाण्यातील मत्स्यपालन, लाकूडकाम,  क्रिकेट बॅट,  केशर,  हस्तकला आणि फलोत्पादन यासारख्या घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून स्टार्ट अप ला प्रोत्साहन देतील.

सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये श्रीनगर-जम्मू-लखनपूर महामार्गाचा तसेच काझीगुंड-बनिहाल बोगदा आणि श्रीनगर रिंग रोडचा समावेश आहे.

जम्मू:

जम्मू रिंग रोडसह वेगाने विकसित होणारी रेल व रस्ता जोडणी होत असलेल्या जम्मू मध्ये भरभराट होत असलेल्या धार्मिक पर्यटनामुळे  आणि सुतारकाम, गिरण्या, बासमती तांदळाचा व्यापार, तांदूळ गिरण्या, गालिचे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विद्युत वस्तू अशा व्यवसायात होत असलेल्या प्रगतीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे.

लडाख:

लाडवाग्स, उंच मार्गाची भूमी, या भूमीची स्वतःची धोरणात्मक संवेदनशीलता देखील आहे. या प्रदेशाला नेहमीच काश्मीर खोऱ्यातील सत्ताधाऱ्यांकडून सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे.

लडाखला स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश बनवण्याच्या मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या प्रदेशातील शांतताप्रेमी जनतेसाठी शांतता, प्रगती व समृद्धी आणि विकास आणि आर्थिक वाढीच्या क्षेत्रामधील क्षेत्रीय असमतोल सुधारण्याची एक नवीन पहाट दिसली आहे.

सर्व हवामानात तग धरून राहणारे रस्ते आणि महामार्ग, नेटवर्क खडतर  भूभाग आणि मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासास लडाख मध्ये अभूतपूर्व चालना मिळत आहे. लडाखमध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठा जोर देण्यात आला आहे.

फळबाग व नगदी पिकांसाठी सिंचन सुविधेत केलेल्या सुधारणांमुळे  उत्पादकता वाढली असून शेतकऱ्यांच्या खिशात आता  ज्यादा  पैसे यायला लागले आहेत.

शेवटचे पण तितकेच महत्वाचे, कलम 370 रद्द करणे आणि दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्याने तिन्ही प्रदेशातील स्थानिक समुदायांना सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची जाणीव झाली आहे. या खोऱ्यातील तरुण सुरक्षा दलांमध्ये आणि नागरी सेवेत रुजू झाले आणि शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत यावरून हे स्पष्ट झाले आहे.

काश्मीरमध्ये तसेच लडाखमध्येही आज महिला हक्क आणि मुलींच्या शिक्षणाबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली आहे.

समाजकंटकांना दूर ठेवण्यासाठी आणि तरुणांना दहशतवादा कडे नेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत प्रयत्नांचे बिंग उघड करण्यासाठी लोक स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

 

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644104) Visitor Counter : 123