गृह मंत्रालय
“मोदी सरकार आपल्या विणकर समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे”-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
“2014 नंतर प्रथमच, आमच्या मेहनती विणकरांचे खरे कौशल्य विकसित केले जात आहे आणि त्यांना त्यांचे योग्य श्रेय दिले जात आहे”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये विणकरांना भारताच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला”
“पंतप्रधान मोदींचा ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र हातमाग क्षेत्राचे मनोबल निश्चितच वाढवेल”
Posted On:
07 AUG 2020 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी ‘व्होकल फॉर हॅण्डमेड’चे समर्थन करण्याचा संकल्प करूया.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “मोदी सरकार आमच्या विणकर समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे.” आपल्या ट्विटरवरील संदेशात शहा म्हणाले, “2014 नंतर प्रथमच, आमच्या मेहनती विणकरांचे खरे कौशल्य विकसित केले जात आहे आणि त्यांना त्यांचे योग्य श्रेय दिले जात आहे. विणकरांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना भारताच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला.
केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्रामुळे हातमाग क्षेत्राचे मनोबल नक्कीच वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत करण्यासाठी आपण सर्वांनी ‘व्होकल फॉर हँडमेड’ चे समर्थन करण्याचा संकल्प करू या.”
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644080)
Visitor Counter : 215