केंद्रीय लोकसेवा आयोग

नागरी सेवा परीक्षा, 2019 च्या निकालासंदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण

Posted On: 06 AUG 2020 3:36PM by PIB Mumbai

 

सरकारने नागरी सेवा परीक्षा, 2019 साठी जेवढ्या संख्येने रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे, त्यापेक्षा कमी उमेदवारांची शिफारस आयोगाने केली असल्याची चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे असे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निदर्शनाला आले आहे.

नागरी सेवा परीक्षेअंतर्गत सेवा / पदांवर भरतीसाठी, आयोग भारत सरकारने अधिसूचित केलेल्या परीक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. नागरी सेवा परीक्षा, 2019 साठीच्या 927 रिक्त पदांसाठी आयोगाने पहिल्यांदा 829 उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे आणि नागरी सेवा परीक्षा नियम, 2019 च्या नियम -16 (4) आणि (5) नुसार राखीव यादी देखील तयार केली आहे.

अनेक दशकांपासून ही एक प्रमाणित पद्धत आहे, जेणेकरुन खुल्या प्रवर्गात निवडलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या बाबतीत फायदेशीर असल्यास ते त्यांच्या आरक्षित स्थितीनुसार सेवा आणि संवर्गांची निवड करू शकतात ज्यामुळे ती रिक्त जागा राखीव यादीतून भरली जाऊ शकते. खुल्या प्रवर्गात  निवडलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांनी केलेल्या प्राधान्य निवडीमुळे रिक्त झालेल्या जागा भरून काढण्यासाठी राखीव यादीमध्ये देखील  आरक्षित वर्गातील उमेदवारांची निवड असते . केंद्रीय लोकसेवा आयोगाला नागरी सेवा परीक्षा नियम,2019 च्या नियम 16 (5) नुसार प्राधान्य निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राखीव यादी गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे.

<><><><><>

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643758) Visitor Counter : 292