ऊर्जा मंत्रालय

जुलै महिन्यात एनटीपीसीच्या उर्जानिर्मितीत 13.3 टक्क्यांची वाढ

Posted On: 04 AUG 2020 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020

 

एन टी पी सी म्हणजे नैशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या सार्वजनिक औष्णिक उर्जा कंपनीच्या जुलै महिन्याच्या उर्जानिर्मितीत 13.3 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे., जून महिन्यात 23.59 बीयु असलेली ऊर्जानिर्मिती जुलै महिन्यात 26.73 पर्यंत पोहोचली आहे.

एन टी पी सी ने जारी केलेल्या निवेदनानुसार, NTPC कोळसा केंद्रामध्ये 5.6% वार्षिक वाढ झाली आहे. जुलै 2019 मध्ये 20.74 बीयू असलेली उर्जानिर्मिती 2020 मध्ये 21.89 बीयू इतकी झाली आहे. एन टी पी सीच्या  छत्तीसगढच्या कोर्बा येथील केंद्रात जुलै महिन्यात 100% पीएलएफ होते.

एनटीपीसी ची एकूण उर्जानिर्मिती क्षमता 62910 मेगावॉट इतकी असून, एन टी पी सीची देशभरात 70 उर्जानिर्मिती केंद्र आहेत. त्यापैकी 24 कोळसा, 7 मिश्र उर्जा, एक जलविद्युत आणि 13 अक्षय उर्जा केंद्र आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643348) Visitor Counter : 168