राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी परिचारिकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

Posted On: 03 AUG 2020 5:08PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

परिचारिकांनी राष्ट्रपतींना राख्या बांधल्या आणि कोविड-19 संक्रमण परिस्थितीत आलेले अनुभव विशद केले. राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना तारणहार असे संबोधले आणि त्या कर्तव्य बजावत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवत असल्याचे म्हटले. कर्तव्य कटीबद्धतेमुळे परिचारिकांनी आघाडीवरील कोविड योद्ध्याच्या रुपाने सन्मान प्राप्त केला आहे.

पारंपरिकरित्या, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावांकडून संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राष्ट्रपती म्हणाले की, परिचारिकांच्या बाबतीत, त्या आपल्या समर्पण आणि कटीबद्धतेतून भावांच्या आणि सर्वांच्या मदतीसाठी हात पुढे करत आहेत.

मिलीटरी नर्सिंग सेवेतील दोन सदस्य कोविड-19 पॉझिटीव्ह आढळले होते, मात्र लवकर बरे होऊन त्यांनी नव्या ऊर्जेने आपले कर्तव्य पार पाडल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. राष्ट्रपतींनी संक्रमण काळातील कार्यासाठीच्या सेवेबद्दल पूर्ण नर्सिंग सेवेचे आभार मानले. तसेच त्यांनी सर्व नर्सेसला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.   

यावेळी परिचारिकांनी कोविड-19 रुग्णांसंदर्भातील अनुभव विशद केले. सर्वांचा रोख एकच होता, तो म्हणजे कोविड रुग्णांना चुकीच्या समजुतींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. या समस्या वैद्यकीय माध्यमातून आणि समुपदेशनाद्वारे हाताळल्या जाऊ शकतात. राष्ट्रपतींनी  परिचारिकांचे अनुभव ऐकले आणि देशाप्रती सर्वोत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.  

*****

M.Iyangar/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643180) Visitor Counter : 198